विरोधक आक्रमक, सत्ताधारी निश्‍चिंत 

विरोधक आक्रमक, सत्ताधारी निश्‍चिंत 

नागपूर  - हिवाळी अधिवेशनाला उद्या सोमवारपासून प्रारंभ होत आहे. कर्जमाफी, शिष्यवृत्ती, मंत्र्यांच्या गैरव्यवहाराच्या माध्यमातून विरोधकांनी सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. जनाक्रोश- हल्लाबोल यात्रेच्या माध्यमातून वातवरण तापवले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी आघाडीच्या कार्यकाळातील गैरव्यवहार उघड करण्याचे सूतोवाच केल्याने विरोधक आक्रमक दिसत असतानाही सत्ताधारी निश्‍चिंत आहेत. 

अधिवेशनाचे कामकाज दोन आठवडे निश्‍चित करण्यात आले आहे. यात एकूण 13 विधेयके आणि सहा प्रलंबित विधेयकांचा समावेश आहे. याशिवाय लक्षवेधी, चर्चा आदी कामकाजांचाही समावेश आहे. सर्वाधिक प्रश्‍न कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, बोंडअळी, धानावरील तुडतुड्या याशिवाय कायदा व सुव्यवस्था या विषयावरचे आहेत. नॅशनल क्राइम ब्यूरोने अलीकडे सादर केलेल्या अहवालात मुख्यमंत्र्यांची अडचण झाली आहे. त्यात नागपूरमधील गुन्ह्यामध्ये प्रचंड वाढ झाली असल्याचे म्हटले आहे. देशातील सर्वाधिक गुन्हे असलेल्या शहरांमध्ये नागपूरचा समावेश केला आहे. याशिवाय बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव गेल्या दीड महिन्यापासून फरार आहेत. ते मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जातात. या सर्व प्रश्‍नांची सरबत्ती अधिवेशनात होणार आहे. त्याची उत्तरेही सरकारला द्यावी लागणार आहेत. याशिवाय विरोधकांचा गोंधळ ठरलेलाच आहे. दोन आठवड्यांच्या अवधीत इतके सारे कामकाज संपवणे हे सरकारसमोर आव्हानच राहणार आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तराची जय्यत तयारी करून ठेवली आहे. याशिवाय आघाडीच्या कार्यकाळातील झालेल्या भ्रष्टाचाराचे हत्यार मुख्यमंत्र्यांच्या हाती असल्याने सत्ताधारी निश्‍चिंत आहेत. 

अधिवेशनाचे कामकाज 
एकूण विधेयके - 13 
प्रलंबित विधेयके - 05 

विधानसभा 
लक्षवेधी - 1945 
अर्धा तास चर्चा - 202 
अशासकीय ठराव - 401 
तारांकित प्रश्न - 9675 

विधान परिषद 
लक्षवेधी - 761 
अर्धा तास चर्चा - 37 
अशासकीय ठराव - 163 
तारांकित प्रश्न - 2916 
प्रश्‍नांच्या माध्यमातून अर्धा तास चर्चा - 34 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com