नाना पटोले शरद पवारांच्या भेटीला, 'त्या' बैठकीनंतर राज्यात घडामोडींना वेग

Nana Patole meets sharad pawar महाविकसं आघाडीतील समन्वय, महामंडळ वाटप अशा विविध विषयावर चर्चा होणार असल्याचं कळतंय.
Nana Patole
Nana Patoleesakal

दिल्लीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची खलबलं झाल्यानंतर राज्यातही घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे प्रदेोशाध्यक्ष नाना पटोले आता शरद पवारांची भेट घेणार आहेत. त्यामुळे चर्चांना आणखी वेग आलाय.

राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांच्या वाढणाऱ्या कारवाया हा चर्चेचा प्रमुख मुद्दा असणार असल्याची माहिती मिळत आहे. तर महाविकसं आघाडीतील समन्वय, महामंडळ वाटप अशा विविध विषयावर चर्चा होणार असल्याचं कळतंय. (Nana Patole meets Sharad Pawar)

Nana Patole
दिल्लीत पवार आणि मोदींची भेट, ED कारवाईनंतर घडामोडींना वेग

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचलनालयाने कारवाई केल्यानंतर राज्य विरुद्ध केंद्र संघर्ष आणखी शिगेला गेला आहे. मात्र राऊत यांच्यावर कारवाई झाल्यानंतर संध्याकाळी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राऊत आणि नितीन गडकरींनी उपस्थिती लावली होती. सर्वात महत्वाचं म्हणजे शरद पवारांच्या एका बाजूला संजय राऊत आणि दुसऱ्या बाजूला गडकरी बसले होते. (Sharad Pawar and Narendra Modi Meeting in Delhi

यानंतर शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली आहे. दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याचं कळतंय. हे दोन्ही नेते दिल्लीत भेटले की महाराष्ट्रातही राजकीय घडामोडींना वेग येतो. सध्या हीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे.

Nana Patole
'आधी काका मला वाचवा ऐकू यायचं, आता दिल्लीत...' मनसेचा पवारांना टोला

नुकतेच काँग्रेसचे सर्व आमदार दिल्लीत सोनिया गांधींच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांनी राज्यातील काही मंत्र्यांवरील नाराजी बोलून दाखवली. कार्यक्षम नसणाऱ्या मंत्र्यांची खाती अन्य नेत्यांना द्यावी, अशी मागणी झाली. तसेच पक्षांतर्गत काही बाबींवरही चर्चा झाली. सध्या राज्यात मविआ सरकारवरील नेत्यांवर कारवाई होत आहे.

अद्याप विधानसभेच्या अध्यक्षाची निवडणुकही बाकी आहे. या प्रकरणात आता राज्यपालांनी उडी घेतल्याने प्रकरण आणखी बारगळणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यातच राज्यातील महामंडळं वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याने या विषयावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com