राज्यात टंकलेखन परीक्षेची शनिवारी होणार सांगता

दिगंबर पाटोळे
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

वणी (नाशिक): राज्यातील सुमारे तीन हजारावर टंकलेखन संस्थातील टंकलेखन संस्थामधील टंकलेखनाची टकटकाट बंद झाली असून महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या शेवटच्या टंकलेखन परीक्षेची सांगता राज्यभरात शनिवार (ता. १२) होत आहे. दरम्यान टंकलेखन यंत्राची जागा आता संगणकाने घेतली असून, परीक्षा परीषदेचा शासन निर्मित नवीन संगणक टायपींग अभ्यासक्रम (जीसीसी टीबीसी) हा नविन अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहॆ.

वणी (नाशिक): राज्यातील सुमारे तीन हजारावर टंकलेखन संस्थातील टंकलेखन संस्थामधील टंकलेखनाची टकटकाट बंद झाली असून महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या शेवटच्या टंकलेखन परीक्षेची सांगता राज्यभरात शनिवार (ता. १२) होत आहे. दरम्यान टंकलेखन यंत्राची जागा आता संगणकाने घेतली असून, परीक्षा परीषदेचा शासन निर्मित नवीन संगणक टायपींग अभ्यासक्रम (जीसीसी टीबीसी) हा नविन अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहॆ.

सरकारी निर्णयानुसार शासकीय नोकर्‍या मिळवण्यासाठी असलेल्या स्टेनो, लिपिक, टंकलेखक, क्लार्क या पदांसाठी टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक असते. दहावी व बारावीनंतर अनेक विद्यार्थ्यांना आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे व इतर कारणांमुळे उच्च शिक्षण मिळत नव्हते. अशावेळी कमीत कमी शिक्षण असतानाही व्यवसायाची व नौकरीची संधी प्राप्त करून देणारा टंकलेखन अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदे मार्फत राबवला जात होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून सर्व शासकीय कार्यालये संगणकीकृत झाल्याने सर्व टायपिंग संगणकाच्या की-बोर्डवर होऊ लागले आहे. त्यामुळे टाईपरायटर मशीनची या कार्यालयांना आवश्यकता उरली नसल्याने ते कालबाह्य ठरले आहे. त्यामुळे टंकलेखन अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संगणकाचा अभ्यासक्रम करणे क्रमप्राप्त झाले होते. त्यामुळे  विद्यार्थ्यांला कॉम्प्युटरचे ज्ञान मिळविण्यासाठी दुहेरी आर्थिक भुर्दंड पडत होता. यामुळे हजारो विद्यार्थ्यांसह टंकलेखन व्यावसायिकही अडचणीत आले होते. याचा सारासार विचार करून मॅन्युअर टायपिंग यंत्र व कॉम्प्युटर सिस्टिम यांचा योग्य समन्वय ठेवून शासनाने शासननिर्मित कॉम्प्युटर टायपिंग अभ्यासक्रम कोर्स (जी.सी.सी-टी.बी.सी.) शासनमान्य टायपिंग संस्थांना लागू केला आहे. या नविन अभ्यासक्रमामध्ये वर्ड, एक्सल, पीपीटी, लेटर, स्टेटमेंट, स्पिड पॅरेग्राफ आदीचा समावेश आहे. राज्यासह, गोवा येथे मॅन्युअल टायपिंगची ७ अॉगस्ट पासून परीक्षा सुरु असून १२ अॉगस्ट रोजीच्या परीक्षेच्या शेवटच्या दिवसानंतर टंकलेखनाचा वर्षानुवर्षाचा टाकलेखनाचा खडखडाट कायमचा बंद होणार आहे.

असे असले तरी शेवटच्या घटका मोजेपर्यंत सुरु असलेल्या मॅन्युअल टायपिंग परीक्षेसाठी १ ला ९४ हजार ७२० आणि शॉर्टहँसाठी १२ हजार ७० अशा एकूण २,०६, ७८३ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरुन शेवट पर्यंत चांगला प्रतिसाद दिलेला आहे. यानंतर टंकलेखन यंत्रावरील परिक्षा कायमची बंद होणार  असून आता पर्यंत हजारो संस्थाचालकांना त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह मिळवणू देणारे टंकलेखन यंत्रे आता इतिहास जमा होत असल्याने तीस ते चाळीस वर्षांपासून व्यवसायाशी निगडीत असलेले संस्थाचालकांनी आपणास याबाबत अतिशय वेदनादायी भावना व्यक्त करीत, आधुनिक काळाजी गरज म्हणून नविन संगणक टंकलेखन अभ्यासक्रमाचे स्वागत केले आहे.

शासनाने मॅन्युअल टायपींग अभ्यासक्रम बंद करून सुधारित कॉम्प्युटर टायपींग अभ्यासक्रम सुरु केला आहे. आजच्या स्पर्धात्मक युगातील प्रत्येक विद्यार्थी हा सक्षम असलाच पाहिजे, त्यादृष्टीने येणाऱ्या नवीन बदलाचा स्वीकार टंकलेखन संस्थांनी केला आहे. जिल्ह्यातील सर्वच शासनमान्य टंकलेखन संस्थांनी नवीन संगणक टायपिंग अभ्यासक्रम राबविण्यास सुरुवात केली असून विद्यार्थ्यांचा प्रतिसादही चांगला लाभत आहे.
- सुरेश देवरे, अध्यक्ष नाशिक जिल्हा संगणक टायपिंग असोसिएशन

अठोतीस वर्षांपासून टायपींग इन्स्टिट्यूटचा व्यवसाय करीत आहे. टंकलेखन यंत्रावरची टकटक उद्या बंद होत असल्याने वाईट तर वाटतच आहे. मात्र संगणकीय युगात सर्व शासकिय, निमशासकीय कार्यालयातून टंकलेखन यंत्रे हद्दपार झाले असल्याने शासनाने सुरु नव्याने सुरु केलेला संगणक टायपींग अभ्यासक्रम स्वागतार्ह आहे.
- विनायक ढाडसे, अर्चना टायपिंग इन्स्टिट्यूट, ओझर टाऊनशीप (नाशिक)

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :