राज्यात नवीन उद्योजक तयार होणार - निलंगेकर

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 एप्रिल 2018

मुंबई - स्टार्टअपच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान तसेच नवनवीन संकल्पनावर आधारित नवीन उद्योजक तयार करण्यात येत आहेत. यामध्ये शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील नवीन उद्योजक निर्माण करण्यात येणार असल्याचे कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी बुधवारी येथे सांगितले.

महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीमार्फत सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह-2018 चे उद्‌घाटन कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथिगृह येथे करण्यात आले. त्याप्रसंगी ते म्हणाले, ""नवीन संकल्पनेवर व नवीन तंत्रज्ञावर उद्योजक निर्माण करण्याच्या दृष्टीने स्टार्टअप संकल्पना सुरू करण्यात आली आहे. स्टार्टअप अंतर्गत शिक्षण, कौशल्य, आरोग्य, शेती, स्वच्छ ऊर्जा, पर्यावरण, पाणी आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन, स्मार्ट पायाभूत सुविधा, दळणवळण, आर्थिक, सायबर सुरक्षा या क्षेत्राचा स्टार्टअप योजनेत समावेश आहे. या क्षेत्रातील नवीन उद्योजकांनी आपले अर्ज या सप्ताहात 25 ते31 मेपर्यंत महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीकडे पाठवावयाचे आहेत. यामधील 100 व्यवस्थापन व उद्योजक यांची निवड करून त्यांना निवड समितीपुढे सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे. यामधून प्रत्येक्ष क्षेत्रातील तीन असे एकूण 24 नवीन उद्योजकांची निवड करून त्यांना 15 लाखापर्यंतच्या कामाचे कार्यादेश महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत देण्यात येणार आहे.''

Web Title: new businessman sambhaji patil nilangekar