ठाकरेंना मुख्यमंत्रीपद कळलंच नाही, निवडणूक आली की आमदारांना हॉटेलमध्ये कोंबतात

उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाल्यापासून ही लपवालपवी शिवसेनेसाठी नवीन नाही
nilesh Rane latest news
nilesh Rane latest news
Summary

उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाल्यापासून ही लपवालपवी शिवसेनेसाठी नवीन नाही

सध्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नेत्यांच्या बैठका, गाठीभेटी, दौरे, सभांना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत संपली असल्याने आता आमदारांना स्वत:कडे वळवण्यासाठी खलबतं सुरू झाली आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीने त्यांची मतं फुटू नये म्हणून आमदारांसाठी हॉटेल बूक केलं आहे, यावरून भाजपाच्या निलेश राणे यांनी ठाकेर सरकारवर निशाणा साधला आहे. (nilesh Rane latest news)

निलेश राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणतात, काय शिवसेनेची अवस्था झाली आहे. कुठली ही निवडणूक आली जिथे आमदारकीचं मतदान होणार असेल तर बॅगा भरून आमदारांना बसमध्ये टाकून हॉटेलमध्ये कोंबण्यात येतं. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाल्यापासून ही लपवालपवी शिवसेनेसाठी नवीन नाही, मुख्यमंत्रीपद हे उद्धव ठाकरेंना कळलंच नाही, असं म्हणत त्यांनी सडकून टीका केली आहे. त्यामुळे आता यावर मु्ख्यमंत्री ठाकरे काय उत्तर देणार पहावे लागणार आहे.

nilesh Rane latest news
NCPला मुख्यमंत्रीपदाची आशा? मुंडेंच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

दरम्यान, महाविकास आघाडीने आमदारांची मतं फुटू नये यासाठी हॉटेल बूक केलं आहे. सर्व आमदारांना एकाच ठिकाणी ठेवणार असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेनेही सर्व आमदारांना बॅग भरून वर्षावर बैठकीला येण्यासाठी सांगितलं आहे. वर्षावर मुख्यमंत्री सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार असून यानंतर त्यांची रवानगी हॉटेलवर होणार आहे. सर्व आमदारांना सुरक्षित ठेवणार असून त्यांची सर्व काळजी घेतली जाईल, असं सेनेच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

nilesh Rane latest news
अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणताय, एकट्यानेच तुम्हा तिघांचा धुर काढलाय

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्र्यांसोबत राज्यसभेचं समीकरण जुळवून आणण्यासाठी बैठक घेणार आहे. आणि संध्याकाळी मुख्यमंत्री राज्यातील अन्य अपक्ष आमदारांसोबत बैठक घेणार असून त्यांचं मन वळवण्याचं काम सुरू आहे. आता निलेश राणेंच्या या ट्विटवर शिवसेना कोणती भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com