संभाजी ब्रिगेडचा संबंध नाही - नितेश राणे

उर्मिला देठे
मंगळवार, 3 जानेवारी 2017

राम गणेश गडकरींचा उद्यानातील पुतळा हटवण्याची घटना निंदनीय आहे. असे प्रकार होणे चुकीचे आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. पोलिस योग्य तो तपास करतील.
- गिरीष बापट, पालकमंत्री गिरीष बापट

मुंबई - पुण्यातील संभाजी उद्यानातील पुतळा हटविण्यात आला. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा पुतळा हटवला आहे. मात्र गडकरींचा पुतळा हटवण्यात संभाजी ब्रिगेडचा काहीही संबंध नसल्याचा दावा कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

राजसंन्यास या नाटकातून राम गणेश गडकरींनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. यातील मजकूर खटकल्याने संभाजी ब्रिगेडच्या 10 ते 15 कार्यकर्त्यांनी रात्री अडीचच्या सुमारास पुतळा हटवला आणि शेजारुन वाहणाऱ्या मुठा नदीत पुतळा फेकून दिल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत असले तरीही अद्याप पुतळ्याचा शोध लागलेला नाही.

दरम्यान, संभाजी ब्रिगेडच्या ज्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले त्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर फिरत आहे. त्याआधारे हा तपास सुरु आहे. संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा हटवण्याचे काम ज्या मर्द मराठ्यांनी केले आहे त्यांना सलाम! अशा शब्दांत कॉग्रेस आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली.

राम गणेश गडकरींचा उद्यानातील पुतळा हटवण्याची घटना निंदनीय आहे. असे प्रकार होणे चुकीचे आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. पोलिस योग्य तो तपास करतील.
- गिरीष बापट, पालकमंत्री गिरीष बापट

राम गणेश गडकरी याचे त्यांच्या क्षेत्रात अमूल्य योगदान आहे. त्यामुळे अशा पद्धतीने पुतळ्याची नासधूस एखाद्‌या संघटनेने करणे किंवा कुणा कार्यकर्त्यांने करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसे नाही, त्यामुळे शिवसंग्राम संघटना म्हणून आम्ही कृतीचा निषेध करतो. राम गणेश गडकरी यांनी नाटकातून संभाजी महाराजांचा अवमान केला की नाही या लिखाणावर आक्षेप असेल तर तो वेगळा विषय असू शकतो. मराठा समाज सर्व समाजाचं पालकत्व घेणारा समाज आहे. त्यामुळे शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांच्या नावाने असे कृत्य करणे, हे त्यांचे थोरपण कमी केल्यासारखे आहे.
- आमदार विनायक मेटे,नेते शिवसंग्राम संघटना

पुण्यात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी असा प्रयत्न होत आहे. पण मतांचे राजकारण करू देणार नाही. ज्या विघातक संघटनांकडून असे कृत्य केले गेले आहे त्यांना कधीही पाठिशी घालणार नाही. अशा विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र पोलिस आयुक्तांना पाठिवले आहे. पुणे महापालिकेकडून हा पुतळा पुन्हा उभारण्यात येईल असे आश्‍वस्त करतो.
- प्रशांत जगताप महापौर, पुणे

महाराष्ट्र

नाशिक : कोपर्डीतील सामुहिक अत्याचार व खून प्रकरणातील संशयीत आरोपींनी विशेष सरकारी वकिलांची साक्ष घेण्याविषयी केलेली याचिका...

01.57 PM

मुंबई : काँग्रेस सोडून ज्यांना जायचे असेल त्यांनी खुशाल जावे. अशा दलबदलू लोकांची पक्षाला गरज नाही. असे संधिसाधू पक्षांतर करीत...

10.54 AM

मुंबई - राज्य सरकारच्या विक्रीकर विभागातल्या कामगिरीवर महालेखापालांनी (कॅग) अनेक प्रकरणांत नाराजी व्यक्‍त केलेली असतानाच...

05.03 AM