शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्या भांडार 

संतोष सिरसट - सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

सोलापूर - राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व शिक्षण अभियानाच्या माध्यमातून मोफत पुस्तके पुरविली जातात. त्याच धर्तीवर पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वस्तात वह्या उपलब्ध करून देण्याचा विचार राज्याचा सहकार विभाग करत आहे. राज्यातील शिक्षक सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जाणार आहे. 

सोलापूर - राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व शिक्षण अभियानाच्या माध्यमातून मोफत पुस्तके पुरविली जातात. त्याच धर्तीवर पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वस्तात वह्या उपलब्ध करून देण्याचा विचार राज्याचा सहकार विभाग करत आहे. राज्यातील शिक्षक सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जाणार आहे. 

सर्व शिक्षण अभियानाच्या माध्यमातून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकाचा प्रश्‍न फारसा भेडसावत नाही. सरकारकडून मोफत पुस्तके दिली जात असल्यामुळे त्याचा भार पालकांवर पडत नाही. मात्र, आपल्या पाल्यांना लागणाऱ्या वह्या खरेदी करण्यासाठी पालकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. बाजारात वह्यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत, त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न सहकार विभाग करत आहे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सहकारी तत्त्वावर शिक्षकांच्या पतसंस्था सुरू आहेत. या पतसंस्था शिक्षकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतात. अनेक पतसंस्थांनी चांगले काम केल्याची उदाहरणेही आहेत. शिक्षकांशी संबंधित संस्था असल्यामुळे या पतसंस्थांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या हितासाठी करण्याचा विचार सहकार विभागाचा आहे. पहिली ते दहावीच्या वर्गांत राज्यात लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात. त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना या उपक्रमाच्या माध्यमातून थोडासा आर्थिक दिलासा देण्याचा विचार सहकार विभागाचा आहे. राज्याचा सहकार विभाग प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षक पतसंस्थांना सभासद करून घेणार आहे, त्यासाठी पतसंस्थांना भागभांडवल द्यावे लागेल. त्याचबरोबर वैयक्तिक पातळीवरही भागभांडवल स्वीकारायचे का, याबाबतही विचारविनिमय केला जात आहे. शिक्षक पतसंस्थांच्या माध्यमातून थेट विद्यार्थ्यांना स्वस्तात वह्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. 

राज्यात शिक्षकांच्या अनेक चांगल्या सहकारी पतसंस्था आहेत. त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वह्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमातून वह्यांची निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होणार आहे. राज्यात पुढील शैक्षणिक वर्षापासून हा उपक्रम राबविण्याचा विचार सहकार विभाग करत आहे. 
- सुभाष देशमुख, सहकारमंत्री 

महाराष्ट्र

मुंबई, - विविध मागण्यांसाठी सार्वजनिक बँकांची शिखर संघटना असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने आज (मंगळवारी) एकदिवसीय...

09.27 AM

मुंबई - खरीप हंगामात राज्य सरकारने जाहीर केलेली तातडीची दहा हजार रुपयांची उचल राज्यातील फक्त २४ हजार शेतकऱ्यांना मिळाली आहे...

04.33 AM

पुणे - राज्यात स्वाइन फ्लूने अत्यवस्थ झालेल्या सर्वाधिक रुग्णांची संख्या पुण्यात असल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे सोमवारी...

04.12 AM