पंचवीसपैकी दोनच विहिरींना पाणी...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

वडूज - गाव परिसरातील हातपंप, कूपनलिकांची पाणीपातळी कमालीची खालावली आहे. परिसरात सुमारे २० ते २५ विहिरी आहेत. त्यापैकी केवळ दोनच विहिरींना पाणी उपलब्ध असल्याने दोन ते तीन किलो मिटरची पायपीट करून ग्रामस्थांना पाणी आणावे लागत आहे. पाणीटंचाईने ग्रासलेल्या धोंडेवाडी (ता. खटाव) गावची ही दुर्दैवी अवस्था आहे. 

मायणीजवळ दोन हजार लोकसंख्येचे धोंडेवाडी गाव. जवान भागवत बागडे यांच्या वीरगतीमुळे नुकतेच चर्चेत आले. गाव परिसराला गेल्या एक ते दीड महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. गावाला टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालय, पंचायत समितीकडे प्रस्ताव दिला आहे. मात्र, अद्यापही गावाला टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी परिसरात वरवण भटकावे लागत आहे. गावातील हातपंप, कूपनलिकांची पाणीपातळी कमालीची खालावल्यामुळे त्या बंद आहेत. परिसरात सुमारे २० ते २५ विहिरी आहेत. त्यांचीही पाणीपातळी कमालीची खालावली आहे. त्यापैकी दोनच विहिरींना सध्या बऱ्यापैकी पाणी उपलब्ध आहे. मात्र, या विहिरीदेखील गावापासून दोन ते तीन किलो मिटर अंतरावर दूरवर आहेत. विहिरींवर आबालवृद्धांपासून ते युवती, महिलांची पाण्यासाठी गर्दी असते. विहिरीत उतरण्यासाठी सुमारे २० फूट खोल व दीड फूट रुंदीची दगडी पायवाट आहे. त्यामुळे ग्रामस्थांना जीव धोक्‍यात घालून विहिरीत पाण्यासाठी उतरावे लागते. शिवाय विहिरीत अर्ध्यापर्यंतच पायऱ्या आहेत. या पायऱ्यांपर्यंत सध्या पाणीपातळी आहे. ही पातळी खालावल्यास मात्र, ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठ्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे.  शासनाने तातडीने टॅंकर सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थ सुनील शिंदे यांनी केली आहे.

Web Title: Only Two well had water