थकीत वीज बिलासाठी प्रोत्साहन योजना - बावनकुळे

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 मार्च 2017

मुंबई - राज्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा व उच्चदाब उपसा जलसिंचन योजनेतील ग्राहकांकडे वीज बिलाची थकबाकी आहे. अशा वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून होत आहे; मात्र पाणीपुरवठ्यात अडचणी निर्माण होऊ नये, यासाठी थकीत रक्कम हप्त्याने भरण्यासाठी प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानसभेत तसेच विधान परिषदेतही निवेदनाद्वारे दिली. 

राज्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व उच्चदाब उपसा जलसिंचन योजनांतील ग्राहकांकडे असलेली वीज बिलाच्या थकबाकीची रक्कम हप्त्यांने भरून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणने प्रोत्साहन योजना आणली आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एका निवेदनातून दिली. 

ते म्हणाले, की ही योजना वीज बिल थकीत असलेल्या सर्व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व उपसा सिंचन योजनांसाठी लागू राहील. मूळ थकीत बिलाच्या रकमेपैकी 20 टक्के रक्कम व चालू महिन्याचे पूर्ण बिल भरल्यानंतर वीज जोडणी पूर्ववत करण्यात येईल. थकबाकीची उर्वरित रक्कम चार समान हप्त्यांत एप्रिल, मे, जून, आणि जुलै या महिन्यांच्या चालू बिलासोबत भरावी लागणार आहे. सवलत दिलेले हप्ते चालू वीज बिलासोबत न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येईल. ही योजना अद्याप वीजपुरवठा खंडित न केलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांसाठी लागू होणार आहे. 

सार्वजनिक पाणीपुरवठा व उच्चदाब उपसा जलसिंचन योजनांच्या थकीत वीज बिलापोटी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. त्यामुळे संबंधित शेतकरी व गावकऱ्यांना पाणीपुरवठ्याच्या अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता असल्यामुळे थकबाकीची रक्कम हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 16 विभागांमधील 42, हजार 50 वीज जोडांची थकबाकी 940.07 कोटी रुपये एवढी आहे. व्याजाची रक्कम 512.09 कोटी आहे. एकूण थकबाकीची रक्कम 1452.15 कोटी रुपये आहे. 

Web Title: Overdue electricity bills for stimulus plan