पंढरपुरात तीन लाख भाविक दाखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

पंढरपूर - कार्तिकी यात्रेसाठी तीन लाखांहून अधिक वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. तथापि, यंदा तुलनेने गर्दी कमी दिसत आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी सोमवारी मोठी रांग लागली होती. दर्शनासाठी 15 तास लागत होते. कार्तिकी यात्रेसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे.

आषाढी यात्रेप्रमाणेच कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ठिकठिकाणांहून दिंड्या येत असतात. टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करणाऱ्या वैष्णवांमुळे सारे वातावरण मंगलमय झाले आहे.

दुपारपासून शहरातील गर्दी आणखी वाढली. शहरातील विविध मठ आणि धर्मशाळांमधून भाविक कीर्तन, प्रवचनात तल्लीन झाल्याचे चित्र दिसत आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात नवमी (ता. 29) ते पौर्णिमा (ता. 4) या कालावधीत तंबू व राहुट्या उभारण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. जादा स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आलेली असल्याने यंदा वाळवंटात स्वच्छता दिसत आहे. यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त आहे.