आता दुसऱ्या छत्रपतींना तुम्ही..; पंकजा मुंडे संभाजीराजेंच्या पाठिशी

पंकजा मुंडे यांंचं महाविकास आघाडीला आवाहन, म्हणाल्या...
Pankaja Munde News
Pankaja Munde Newsgoogle
Summary

पंकजा मुंडे यांंचं महाविकास आघाडीला आवाहन, म्हणाल्या...

सध्या राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्यातील राजकारण चांगलतं तापलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केल्यानंतर त्यांनी राज्यातील इतर पक्षांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. मात्र कोणत्याही पक्षाने त्यांना पाठिंबा जाहीर केला नाही. त्यामुळे आता ते कोणता निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे त्यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या आहेत, याबाबत त्यांनी भाष्य केलं आहे. (Pankaja Munde Latest Marathi News)

पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडीला आवाहन केलं आहे. त्या म्हणाल्या, उदयनराजे भोसले यांच्याबाबतीत जी भूमिका सरकारने घेतली होती, त्याचं आम्ही स्वागतच केलं होतं. एका छत्रपतींना आम्ही राज्यसभेवर पाठवले आहे. आता तुम्ही दुसऱ्या छत्रपतींना राज्यसभेत पाठवावे. ते छत्रपती असून त्यांना मान खाली घालायला लावू नका, असे म्हणत त्यांनी संभाजीराजे छत्रपतींची पाठराखण केली आहे.

Pankaja Munde News
विधान परिषदेसाठी सदाभाऊ खोतांना भाजपचा निरोप, यंदा विश्रांती घ्या

दरम्यान, संजय पवार यांनी शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी अर्ज दाखल केल्यानंतर संभाजीराजेंना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळण्याच्या आशाही संपुष्टात आल्या. त्यामुळे गेल्या काही दिवसांत संभाजीराजेंनी मराठा संघटनांच्या समन्वयकांशी चर्चा केली असल्याचे बोलले जात आहे. आता पंकजा मुंडे यांच्या या पाठिंब्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उत आला आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन अपक्ष लढण्याच्या हेतूने मैदानात उतरलेले संभाजीराजे माघार घेण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाने संभाजीराजेंना राज्यसभेसाठी पाठिंबा न दिल्याने मराठा संघटना आक्रमक झाल्या होत्या. राज्यसभेच्या (Rajya Sabha) उमेदवारीसाठी संभाजीराजे यांनी शिवबंधन हाती बांधावे, असा प्रस्ताव शिवसेनेकडून त्यांच्यासमोर ठेवला होता. पण संभाजीराजेंनी त्यास नकार दिला आहे.

Pankaja Munde News
'चंद्रकांत पाटील साहेब जेवणाचे आमंत्रण देते, सहकुटुंब अवश्य या'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com