दुष्काळमुक्‍तीसाठी महाश्रमदानामध्ये सहभागी व्हा 

aamir
aamir

मुंबई : आमीर खानच्या पाणी फाऊंडेशनतर्फे 1 मे रोजी अर्थात महाराष्ट्रदिनी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कायमचा दुष्काळमुक्त करण्यासाठी अधिकाधिक लोकांनी या श्रमदानामध्ये सहभागी व्हावे आणि कोणत्याही एका गावात जाऊन श्रमदान करावे, असे आवाहन आमीर खानने केले आहे. आतापर्यंत त्याच्या आवाहनाला एक लाख लोकांनी पाठिंबा दिला आहे. हा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचेही त्याने सांगितले. 

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी आमीर खानने पाणी फाऊंडेशनची 2016 मध्ये स्थापना केली. पहिल्याच वर्षी एक प्रयोग म्हणून 116 गावांमध्ये जलसंधारणाचे काम करण्यात आले. आता तेथील पाण्याची समस्या दूर होऊन गावकरी लाखोंचे उत्पन्न घेत आहेत. गेल्या वर्षी पाणी फाऊंडेशनतर्फे "चला गावी' हा प्रयोग राबविण्यात आला. तेव्हा 25 हजार लोकांनी श्रमदानामध्ये भाग घेतला. आता या वर्षी ही संख्या वाढण्यासाठी आमीर खानने कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. शहरातील अधिकाधिक लोकांनी जवळपासच्या किंवा त्यांच्या आवडीच्या गावात जाऊन श्रमदान करावे, असे आवाहन त्याने केले आहे. 

25 एप्रिल ही शेवटची तारीख आहे. आमच्या जलमित्रच्या वेबसाईटवरील फॉर्म श्रमदानासाठी इच्छुक असणाऱ्यांनी भरावयाचा आहे. आम्ही 75 तालुके आता निवडलेले आहेत आणि त्या तालुक्‍यातील आजूबाजूच्या गावात जाऊन श्रमदान करावयाचे आहे. सकाळी 6 ते 10 आणि दुपारी 4 ते सायंकाळी 7 अशा दोन वेळा श्रमदानासाठी निवडलेल्या आहेत. ज्यांना जी वेळ सोयीस्कर आहे त्यांनी त्या वेळेत त्यांच्या इच्छेनुसार गावात जाऊन श्रमदान करावयाचे आहे. 

असे व्हा जलमित्र 
ज्या कुणाला आमीरच्या महाश्रमदान मोहिमेत सहभागी व्हायचे आहे, त्यांना येत्या 25 एप्रिलपर्यंत jalmitra.paanifoundation.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करता येणार आहे. याबद्दल आमीर खान म्हणाला, की या जलमित्र अभियानात सामील होण्यासाठी गेल्या तीन आठवड्यांत एक लाख लोकांनी नोंदणी केली आहे. काही दिवसात ही संख्या आणखीन वाढेल. या मोहिमेत स्वतःहून काही सामाजिक संस्था जोडल्या गेल्या आहेत. सेलिब्रिटी तसेच विविध राजकीय पक्षांचा आमच्या या उपक्रमाला चांगला पाठिंबा मिळत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com