प्रवाशांच्या मागणीनुसार काळी-पिवळी "गारेगार' 

सिद्धेश्‍वर डुकरे
बुधवार, 12 एप्रिल 2017

मुंबई - प्रवाशांच्या मागणीनुसार काळ्या-पिवळ्या टॅक्‍सीची वातातुकूलित यंत्रणेची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे यापुढे प्रवाशांच्या मागणीनुसार काळी-पिवळी टॅक्‍सी गारेगार होणार आहे. याबाबतचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. 

मुंबई - प्रवाशांच्या मागणीनुसार काळ्या-पिवळ्या टॅक्‍सीची वातातुकूलित यंत्रणेची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे यापुढे प्रवाशांच्या मागणीनुसार काळी-पिवळी टॅक्‍सी गारेगार होणार आहे. याबाबतचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. 

राज्यात व मुंबई महानगर क्षेत्रात बहुतांश काळ्या-पिवळ्या टॅक्‍सींमध्ये वातानुकूलन यंत्रणा आहे. प्रवाशाने मागणी केल्यावर अधिकचे भाडे आकारून वातानुकूलन यंत्रणा सुरू करण्याचा सरकारच्या परिवहन विभागाचा विचार होता. त्याला अनुसरून हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे परिसरात सध्या पन्नास हजारच्या आसपास काळ्या-पिवळ्या टॅक्‍सीची संख्या आहे. यामध्ये बहुतांश टॅक्‍सींमध्ये एसी यंत्रणेची सुविधा आहे. त्याचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे. प्रचलित भाडेदरापेक्षा 20 टक्‍के इतके जादा भाडे आकारून ही सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी ज्या टॅक्‍सीमध्ये ही यंत्रणा उपलब्ध असेल अशा वाहनांच्या समोरील काचेवर यापुढे लाल अक्षरात "एसी' असे लिहणे सक्‍तीचे आहे. 

खासगी टॅक्‍सी कंपन्यांची मक्‍तेदारी मोडण्याचा हेतू 
काळ्या-पिवळ्या टॅक्‍सीच्या प्रवाशांना सुविधा देताना खासगी टॅक्‍सी कंपन्यांना शह देण्यासाठी परिवहन विभागाने हा निर्णय घेतला आहे. खासगी टॅक्‍सी कंपन्यांची मक्‍तेदारी मोडून काढताना काळ्या-पिवळ्या टॅक्‍सीने प्रवास करताना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात हाही यामागील उद्देश असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Passenger demand Black-yellow