राजीव राजळे यांना अखेरचा निरोप 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

पाथर्डी - "अमर रहे, अमर रहे; राजीव राजळे अमर रहे' अशा घोषणा देत माजी आमदार राजीव राजळे यांच्या पार्थिवावर आज दुपारी तालुक्‍यातील कासार पिंपळगाव येथील दादा पाटील राजळे महाविद्यालयाच्या प्रांगणात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

राजळे यांनी तब्बल दीड-दोन महिने न्यूमोनिया आजाराशी झुंज दिली. नगर व मुंबईतील खासगी रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांना काल (शनिवारी) रात्री उशिरा हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. ते 47 वर्षांचे होते. 

राजीव राजळे यांच्या मागे पत्नी आमदार मोनिका, मुले कृष्णा व कबीर, ज्येष्ठ नेते असलेले वडील अप्पासाहेब, आई, जिल्हा परिषद सदस्य असलेला भाऊ राहुल, नेवासे पंचायत समितीची सभापती असलेली बहीण सुनीता गडाख, असा मोठा परिवार आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे राजळे यांचे मामा, तर आमदार डॉ. सुधीर तांबे व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू हे काका, संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गा तांबे मावशी आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री अशोक पाटील डोणगावकर सासरे होत. 

Web Title: Pathardi news Rajeev Rajale dead