राष्ट्रपतिपदाचा उमेदवारीचा प्रस्ताव पवारांनी नाकारला 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 19 मे 2017

मुंबई - राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असली, तरी पवार यांनी हा प्रस्ताव नाकारला आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची पवार यांनी नुकतीच भेट घेतली होती. या वेळी सोनिया गांधी यांनी त्यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीबाबत विचारणा केली. सर्व विरोधकांचा सर्वसमावेशक उमेदवार म्हणून पवार यांना सर्वाधिक पसंती आहे. मात्र पवार यांनी सोनिया गांधी यांना आपण या शर्यतीत नसून मला वगळून नवीन उमेदवार शोधावा. विरोधकांनी सर्वानुमते उमेदवार दिल्यास राष्ट्रवादीचा पाठिंबा असेलच.

मुंबई - राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असली, तरी पवार यांनी हा प्रस्ताव नाकारला आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची पवार यांनी नुकतीच भेट घेतली होती. या वेळी सोनिया गांधी यांनी त्यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीबाबत विचारणा केली. सर्व विरोधकांचा सर्वसमावेशक उमेदवार म्हणून पवार यांना सर्वाधिक पसंती आहे. मात्र पवार यांनी सोनिया गांधी यांना आपण या शर्यतीत नसून मला वगळून नवीन उमेदवार शोधावा. विरोधकांनी सर्वानुमते उमेदवार दिल्यास राष्ट्रवादीचा पाठिंबा असेलच. मात्र मी या पदाच्या शर्यतीत नाही, असे स्पष्ट केल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. 

सध्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूल कॉंग्रेस, डावे पक्ष, बिजू जनता दल, लालू प्रसाद यांचा राष्ट्रीय लोकदल, तर नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल हे सर्व पक्ष एकत्र येण्याचे संकेत आहेत. त्यांना समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, एआयडीएमकेचाही पाठिंबा मिळण्याची शक्‍यता आहे. 

या सर्व विरोधी पक्षाची मोट बांधून शरद पवार हेच सर्वसमावेशक उमेदवार होऊ शकतात अशी जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र पवार यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रस्तावाला नकार दिल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.