लोकसभेच्या तोंडावर राजकीय छत्र्या

लोकसभेच्या तोंडावर राजकीय छत्र्या

मुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना देशात नव्या राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे. २० जून ते १८ ऑगस्ट २०१८ या दरम्यानच्या अवघ्या ६५ दिवसांत निवडणूक आयोगाकडे तब्बल ३२ नव्या राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. निवडणूक जवळ येईल तशी राजकीय पक्षांच्या संख्येत आणखी भर पडण्याची शक्‍यता आहे.

राजस्थान विधानसभेची निवडणूक येत्या डिसेंबरमध्ये होऊ घातली आहे. ती डोळ्यांसमोर ठेवत राजस्थानच्या राजकारणात सहा नव्या पक्षांची भर पडली आहे. विसर्जित तेलंगण विधानसभेची निवडणूक डिसेंबरमध्ये होण्याची शक्‍यता असल्याने या राज्यात तीन नव्या पक्षांची नोंदणी झाली आहे. उत्तर प्रदेशातही नव्या राजकीय पक्षांच्या नोंदणीचे प्रमाण अधिक आहे. लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर नवे पक्ष स्थापन होत असतात. केवळ निवडणूक लढवण्याच्या हौसेपोटी नव्या पक्षाची मुहूर्तमेढ रोवली जाते. निवडणूक झाल्यानंतर अशा पक्षांचे अस्तित्व कागदोपत्री राहते, असे निरीक्षण मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी नोंदवले.

हे नवे राजकीय पक्ष ...
भारत वाहिनी पार्टी, भारतीय जनसत्ता पार्टी, अभिनव राजस्थान पार्टी, पंच पार्टी, राजस्थान जनता पार्टी, खुशहाल किसान पार्टी (राजस्थान) मक्कल निधी मय्यम,  माय इंडिया पार्टी (तमिळनाडू), नव समाज पार्टी, जय स्वराज पार्टी, (तेलंगण),  आपकी अपनी, मजदूर किरायेदार विकास पार्टी, राष्ट्रीय सहयोग पार्टी (नवी दिल्ली), आदर्श संग्रम पार्टी, न्यू मदरलॅण्ड पार्टी, भारतीय अनारक्षित पार्टी, साफ पार्टी, गरीब बेरोजगार विकास पार्टी, जागो हिंदुस्थान पार्टी (उत्तर प्रदेश), लोकतांत्रिक जनता दल (हरियाना), कल्याण क्रांती पार्टी, न्यू इंडिया युनायटेड पार्टी (कर्नाटक), ऑल इंडियन्स पार्टी (आंध्र प्रदेश),  विकासशील इन्सान पार्टी (बिहार), लोकजागर पार्टी (महाराष्ट्र)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com