'चंद्रकांत दादा आकड्यांपेक्षा खड्ड्यांबद्दल बोला'

road.jpg
road.jpg

रोज कुठल्या ना कुठल्या आणि  कसल्या ना कसल्या प्रकारच्या निवडणुका हा आपल्या लोकशाहीचा एक भाग बनत चालला आहे. त्यामुळे महिन्याभरात जर कुठल्या ना कुठल्या निवडणुका नजरेच्या टप्प्यात आल्या नाहीत, तर आपल्याला काहीसे करमेना असे होते. लोकसभा निवडणूक सात ते आठ महिन्यांवर आहेत. त्यापाठोपाठ राज्याच्या विधानसभेची निवडणूक असेल. सत्ताधारी पक्षाने त्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. कालच पुण्यात राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले कि भाजप शिवसेनेला बरोबर घेऊन राज्याच्या विधानसभा निवडणुकीत 200 पेक्षा जास्त जागा जिंकेल. विकास कामे मोठ्या प्रमाणात झाल्याने तसेच रस्त्याच्या कामाचा मोठा वेग पाहून दोन्ही काँग्रेसला भीती वाटते. दोन्ही काँग्रेस वेगवेगळे लढल्यावर विधानसभेच्या सध्या असलेल्या 80 जागा 40 पर्यंत जागा कमी होतील. मंत्र्यांची अशी वक्तव्ये म्हणजे याचीच साक्ष देतात कि जनतेचे प्रश्न आमच्यासाठी दुय्यम आहेत आणि निवडणूक प्रथम स्थानी आहेत. चंद्रकांत पाटील पहिल्यांदाच असे बोलले असे नाहीत. सांगलीत बोलताना तर ते म्हणाले आता सांगली जिंकली आहे आता केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये आम्ही जिंकू. कोणत्याही पक्षाने आम्ही जिंकू असे म्हणणे गैर नाही. पण त्यासाठी योग्य वेळ असते. राज्यातील प्रमुख समस्यांकडे दुर्लक्ष करून कायम निवडणुकांविषयी बोलण्यात सत्ताधारी दंग आहेत.

कारण लोकशाही आता गुणवत्ता विसरून नुसत्या आकड्यांचा खेळ होऊन बसला आहे. त्यात अधिक आकडे जोडू शकेल, तो लोकशाहीचा विजेता असतो आणि ज्याला आकडे जमवण्याची कला अवगत नाही, तो लोकशाहीतला पराभूत असतो. तुम्ही कोणते विचार मांडता वा कुठला जनहिताचा कार्यक्रम घेऊन समोर येता, त्याला काडिमात्र किंमत राहिलेली नाही. आजच्या लोकशाहीत आकड्यांना महत्व आलेले आहे. बहूमताचा आकडा हे प्रत्येकाचे ध्येय होऊन बसले आहे आणि त्यात विचार वा गुणवत्तेला स्थान उरलेले नाही. सत्तापदे हे साध्य झाले असून, कुठल्याही मार्गाने सत्ता संपादन करण्याला साधना समजले जात आहे. 

राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली मुदत संपून आठ महिने झाले. राज्याच्या विविध विभागांचा आढावा घेतल्यास अजून बांधकाम खात्याच्या अखत्यारीतील रस्त्यांवर खड्डे अद्यापही कायम आहेत. यापूर्वीही अशीच मुदत चंद्रकांतदादांनी जाहीर केली होती. दरवर्षी रस्ते करायचे, पावसाळ्यात खड्डे पडणार आणि मंत्री ठरावीक मुदतीत राज्य खड्डेमुक्त करणार अशी घोषणा करणार ही परंपराच पडली आहे.

राज्यातील रस्त्यांची कामे आणि दुरुस्ती हा गंभीर विषय ठरला आहे. दरवर्षी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तीन ते चार हजार कोटी रस्त्यांच्या कामांवर खर्च केले जातात. याशिवाय केंद्र सरकारच्या भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडून राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती वा नवीन कामांवर मोठय़ा प्रमाणावर खर्च होतो. महानगरपालिकांमधील रस्त्यांची अवस्था तर आणखी भयानक आहे. राज्याच्या विविध विभागांचा आढावा घेतल्यास अजून बांधकाम खात्याच्या अखत्यारीतील रस्त्यांवर खड्डे अद्यापही कायम आहेत. गेल्या वर्षीही अशीच मुदत चंद्रकांतदादांनी जाहीर केली होती. दरवर्षी रस्ते करायचे, पावसाळ्यात खड्डे पडणार आणि मंत्री ठरावीक मुदतीत राज्य खड्डेमुक्त करणार अशी घोषणा करणार ही परंपराच पडली आहे.

राज्यातील रस्त्यांची कामे आणि दुरुस्ती हा गंभीर विषय ठरला आहे. दरवर्षी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तीन ते चार हजार कोटी रस्त्यांच्या कामांवर खर्च केले जातात. याशिवाय केंद्र सरकारच्या भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडून राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती वा नवीन कामांवर मोठय़ा प्रमाणावर खर्च होतो. महानगरपालिकांमधील रस्त्यांची अवस्था तर आणखी भयानक आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत शेजारील कर्नाटक आणि गुजरातमधील रस्त्यांचे दाखले दिले जातात. कर्नाटकात जाताना महाराष्ट्राची सीमा कधी संपली हे रस्त्यांवरून समजते. 

पावसाचे प्रमाण जास्त असल्याने रस्त्यांवर खड्डे पडतात, असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केला जातो. पण त्याच वेळी खासगीकरणातून करण्यात आलेल्या किंवा टोल वसूल करण्यात येणाऱ्या रस्त्यांवर मात्र खड्डे नसतात. अमेरिकेतील सिआटेलची राजधानी असलेल्या वॉशिंग्टन या प्रांतात सर्वाधिक पाऊस पडतो. पण सिआटेल किंवा आसपासच्या रस्त्यांवर एक खड्डा सापडत नाही. राज्यात सत्ताबदल झाल्यावर चंद्रकांत पाटील यांनी यापुढील काळात रस्ते तयार करताना शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केले जातील आणि हे रस्ते चांगले टिकतील, अशी ग्वाही दिली होती. पण गेल्या तीन वर्षांत रस्त्यांच्या अवस्थेत काही फरक पडलेला नाही. रस्त्यांवरील खड्डे आजही कायम आहेत. चंद्रकांत दादांनी निवडणुकीच्या आकड्यांपेक्षा खड्डयांकड़े लक्ष दिले आणि ते दुरुस्त झाले तरी जनता तुम्हाला मतदान करून 200 पेक्षा जास्त जागा  मिळवून देईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com