प्रतापराव पवार यांना महर्षी पुरस्कार जाहीर

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

पुणे - सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे यंदाचा "महर्षी पुरस्कार‘ "सकाळ‘चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना जाहीर झाला आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (ता. 6) हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. 

पुरस्कार वितरण सोहळ्याला माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी उपस्थितीत राहणार आहेत, अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागूल यांनी दिली. श्री लक्ष्मीमातेची चांदीची प्रतिमा, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफल असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, पं. जसराज, शिल्पकार बी. आर. खेडकर, शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 
महोत्सवाचे यंदा 22वे वर्ष असून, 1 ते 11 ऑक्‍टोबर या कालावधीत हा महोत्सव होणार आहे. 

पवार हे उद्योगांशी संबंधित अनेक कंपन्यांचे संचालकपद भूषवीत आहेत. देशातील विविध वृत्तपत्र संस्थांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले असून, वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्समध्येही त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्‍युलेशन (एबीसी) या संस्थेच्या कार्यकारिणीवर त्यांची नुकतीच निवड झाली आहे.

महाराष्ट्र

मुंबई : ऐतिहासिक शेतकरी संपानंतर आता राज्य सरकारने 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी आज (शनिवार) जाहीर केली. राज्यातील शेतकऱ्यांची...

शनिवार, 24 जून 2017

नागपूर : महाकवी कालिदास म्हणजे "मेघदूत' हे एक समीकरणच झाले आहे. अतिशय दर्जेदार असे हे महाकाव्य कित्येक वर्षांपासून देश-विदेशातील...

शनिवार, 24 जून 2017

पातूर - दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्‍यातील अटाळी ते पंढरपूर वारकऱ्यांची पायी वारी जात असते...

शनिवार, 24 जून 2017