पोपट पाळल्यास तुरुंगवास

पोपट पाळल्यास तुरुंगवास

मुंबई - घरात पोपट पाळण्याची हौस महागातही पडू शकते. पोपट पाळणे कायद्याने बंदी असल्याने २५ हजार रुपयांपर्यंतचा दंड तसेच वेळ पडल्यास तीन महिन्यांपर्यंत तुरुंगाची हवा खावी लागेल. यामुळे पाळीव पोपट आठवडाभरात वन विभागाकडे सुपूर्द करण्याची मुदत देण्यात आली आहे.

टिटवाळा येथे काही दिवसांपूर्वी भविष्य सांगणाऱ्या पोपटांचा बाजार भरला होता. या बाजाराची माहिती मिळताच वन विभागाने छापा घालून एकाला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर मालाड येथेही पोपट विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर ठाणे वन विभागाच्या मुंबई टीमने बनावट खरेदीदार बनून दोघांना रंगेहात पकडले. या दोघांकडून दंड वसूल करून मंगळवारी सोडण्यात आले. हे पोपट मुंबईबाहेरून विक्रीसाठी आणण्यात आले होते, अशी माहिती मुंबई विभागाचे वनक्षेत्रपाल संतोष कंक यांनी दिली. फोर्ट येथील महात्मा फुले मंडईतील पोपट विक्रीवर आळा बसला आहे. तरी छुप्या पद्धतीने पोपटांची विक्री सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारतीय पोपट हे वन्यजीव संवर्धन कायदा १९७२ नुसार पाळण्यास आणि त्यांचा खेळ मांडण्यास मज्जाव आहे. 

नाशिकचे पोपट मुंबईत
मुंबई परिसरात नाशिक आणि मालेगावमधून पोपट विक्रीसाठी आणण्यात येत असल्याचे वन विभागाच्या कारवायांमधून उघड झाले आहे. त्यामुळे या मार्गावर वन विभागाचे लक्ष आहे. त्याचबरोबर ज्यांनी पोपट पाळले असतील त्यांनी सात दिवसांच्या आता वन विभागाकडे आणून द्यावेत. त्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे वन क्षेत्रपाल संतोष कंक यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com