मुख्यमंत्री बचावले ही बातमी आनंददायक: पृथ्वीराज

Prithviraj Chavan
Prithviraj Chavan

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हेलिकॉप्टर अपघातातून बचावल्याची बातमी आनंददायक असल्याचे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

लातूर दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला आज (गुरुवार) सकाळी अपघात झाला असून, या अपघातातून मुख्यमंत्री थोडक्यात बचावले. सकाळी निलंगा येथून उड्डाण घेत असताना मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. वीजेच्या तारांना स्पर्श झाल्याने हेलिकॉप्टर कोसळले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह सरकारी अधिकारी हेलिकॉप्टरमध्ये होते. हेलिकॉप्टर जास्त उंचीवर नसल्याने सर्वजण बचावले आहेत.

पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करत म्हटले आहे, की मुख्यमंत्री आणि त्यांची टीम सुखरुप असल्याचे वृत्त आनंददायक आहे. लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करु नये. 

मुख्यमंत्री सुदैवाने बचावले. पण व्हीआयपींना दिल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टरची नियमित, वेळेवर देखभाल होते का, हे तपासण्याची गरज आहे. अत्याधुनिक, दोन पायलट असलेले हेलिकॉप्टर वापरले पाहिजेत, असे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या ः
सगळ्यांच्या आशीर्वादाने सुखरुप: मुख्यमंत्री​
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात; मुख्यमंत्री बचावले​
भारतीय कन्येचे स्वागत आहे: सुषमा स्वराज​
पाकिस्तानचा दावा संयुक्त राष्ट्रानेही फेटाळला​
शिरुर: विनयभंग प्रकरणी महाराजाला मंदिरातून अटक​
तेजस एक्स्प्रेसमधून हेडफोन चोरीला, एलईडी स्क्रीनवर स्क्रॅच
पुणे अन् कोल्हापुरमधील अपघातग्रस्त बसचा क्रमांक एकच​
सहारनपूरमध्ये मोबाईल इंटरनेटवर बंदी​
काश्मीरमध्ये निर्णय घेण्यासाठी लष्कराचे हात मोकळे: जेटली
शेतकऱ्यांना फसवणाऱ्या टोळक्यात मीही सामील झालो: राजू शेट्टी

मराठा क्रांती मोर्चा 9 ऑगस्टला मुंबईत धडकणार
मुंबई : हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com