मुंबईचे कर्जदारही खासगी सावकारांच्या विळख्यात

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

मुंबई - खासगी सावकारांकडून मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याच्या व्यथा ताज्या असतानाच मुंबईतील कर्जदाराही विळख्यात सापडले आहेत. मुंबईतील खासगी सावकारांनी कर्जदारांना 163 कोटी 92 लाख रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आल्याची कबुली सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रकाश गजभिये, कॉंग्रेसचे रामहरी रूपनवर यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्‍नाला त्यांनी लेखी उत्तर दिले. 

राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांनी खासगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाला माफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने गेल्या वर्षी घेतला होता. या अनुषंगाने 19 जिल्ह्यांतील 1445 खासगी सावकारांकडून कर्ज घेतलेल्या 46 हजार 809 कर्जदारांचे 66 कोटी 33 लाख रुपयांचा निधी शासनाने संबंधित सावकारांना दिला. मुंबई शहरातही 2017 नोंदणीकृत खासगी सावकार आहेत.2015 या वर्षात या सावकारांकडून 33 हजार 871 कर्जदारांना 96 कोटी 52 लाख, तर यंदाच्या वर्षी गेल्या सहा महिन्यांत 67 कोटी 40 लाख रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आल्याची माहिती देशमुख यांनी दिली. 

पीककर्जाचे वाटप व पुनर्गठन 

मराठवाडा व विदर्भातील दुष्काळग्रस्त 16 जिल्ह्यांतील 14 लाख 60 हजार 702 शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी 8585 कोटी 38 लाख रुपयांच्या पीककर्जाचे वाटप करण्यात आले, तसेच याच भागातील 1 लाख 64 हजार 586 शेतकऱ्यांच्या 1342 कोटी 86 लाख रुपयांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आल्याची माहिती देशमुख यांनी दिली.