सव्वातीन कोटींचा प्रस्ताव रखडला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

कऱ्हाड - कोयना प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या ५४ गावठाणांत नागरी सुविधांसाठी तीन कोटी ३६ हजारांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. संबंधित गावे जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्‍यात पुनर्वसित आहेत. त्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी स्तरावर तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. तो प्रस्ताव आयुक्तांकडे प्रलंबित आहे. रस्ते, विहीर बांधणे यासह विविध नागरी सुविधांचा त्या कामात समावेश आहे. 

कऱ्हाड - कोयना प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या ५४ गावठाणांत नागरी सुविधांसाठी तीन कोटी ३६ हजारांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. संबंधित गावे जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्‍यात पुनर्वसित आहेत. त्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी स्तरावर तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. तो प्रस्ताव आयुक्तांकडे प्रलंबित आहे. रस्ते, विहीर बांधणे यासह विविध नागरी सुविधांचा त्या कामात समावेश आहे. 

कोयना प्रकल्पातून अनेक गावे विस्थापित झाली. जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्‍यांत ती गावे पुनर्वसित झाली. त्या ठिकाणी सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पुनर्वसित ५४ गावठाणांत नागरी सुविधांसाठी प्रकल्प यंत्रणेने प्रस्ताव दिला आहे. त्यासाठी तीन कोटी ३६ लाखांचा निधी त्यांना अपेक्षित आहे. अनेक दिवसांपासून तो प्रस्ताव शासनाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. विहिरी खुल्या करण्यासह पुनर्वसित गावांतील रस्त्यांची कामे त्यात समाविष्ट आहेत. कोयना जलविद्युत प्रकल्पाचा प्रस्ताव आयुक्त स्तरावर मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. यापूर्वी शासनाने जिल्ह्यातील जावळी, महाबळेश्वर, कोरेगाव, सातारा नागरी सुविधांसाठी प्रस्ताव मंजूर केला होता. त्यासाठी पावणेदोन कोटींचा निधीही दिला आहे. 

प्रस्ताव पाठविलेल्यांमध्ये कुसवडे, कुसवडे-पळसरेवाडी, आरल-निवकणे, नहिंबे- चाफोली, आरल- चाफोली, जुंगटी- दिवशी, शिरशिंगे- नहिंबे, बाजे, नहिंबे- तामकणे, गाढवखोप- रासाटी, दास्तान- रासाटी, आंबेघर- रासाटी, भोजगाव- गोषटवाडी, गोजेगाव- वांजोळे, वाझेगाव- बी मारूल, बाजे- मारुल, चिरंबे-विहे, किसरुळे, मानाईनगर, मिरगाव, कामरगाव, हुंबरळी, मिरगाव-तोरणे, हुंबरळी-देशमुखवाडी, कुसवडे-घाटमाथा, कामरगाव-गोकुळ एस, करंजवडे-शिवंदेश्वर, नहिंबे- शिवंदेश्वर, नवजा-डिचोली, कामरगाव-गोकुळ बी, किसरुळे- बोपोली, मिरगाव- बोपोली, किसरुळे- शिवंदेश्वर, किसरुळे-ढाणकल, नवजा-ढाणकल, झाडोली- नेचल, म्हाळुंगे- शिवंदेश्वर, किसरुळे- मेंढेघर, तळोशी- कोडावळे, कुसवडे- कोडावळे, तुळोशी- कोडोली, रोहिणे- कोडोली, देवघर- गोवारे, पुनवली- रिसवड, ढोकावळे- रिसवड, चिरंबे- कोडोली, मिरगाव- चाफेर, नहिंबे- तळीये, चिरंबे- मणेरी, कुसवडे- झाकडे, तळोशी- गोषटवाडी, खांडेकरवाडी- शिंदेवाडी, किसरुळे- रासाटी व नवजा या गावांचा समावेश आहे. यापैकी शिरशिंगे, नहिंबे या गावांचे पलूस तालुक्‍यात पुनर्वसन झाले आहे. अन्य सर्व गावे सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये पुनर्वसित आहेत. त्या गावांमध्ये वेगवेगळ्या विकासकामांसाठी तीन कोटी ३६ लाखांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

Web Title: proposal firm