मतदानासाठी राज्यात सार्वजनिक सुटी जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

मुंबई - राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत या निवडणुकांच्या मतदानासाठी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. 

जळगाव, नगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली या पंधरा जिल्हा परिषदांकरिता त्यांच्या कार्यक्षेत्रात व त्याअंतर्गत 165 पंचायत समित्यांच्या क्षेत्रामध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी, म्हणजे येत्या गुरुवारी (ता. 16) सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली 

आहे. मात्र, यातील गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत कोरची, कुरखेडा, देसाईगंज (वडसा), आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा या आठ पंचायत समितीपुरती ही सुटी मर्यादित राहील. त्याचप्रमाणे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती व गडचिरोली या अकरा जिल्हा परिषदांसाठी त्यांच्या कार्यक्षेत्रात व त्याअंतर्गत 118 पंचायत समित्यांच्या क्षेत्रामध्ये तसेच बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती व नागपूर या दहा महानगरपालिकेच्या क्षेत्रात सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी मंगळवारी (ता.21) सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, यातील गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या चार पंचायत समिती क्षेत्रापुरती सदरची सुटी मर्यादित राहील, असे सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र

पुणे : "बाई तू आम्हास्नी दारूबंदी कशी करायची ह्ये मोबाईलवर दाखवलं. आम्हास्नी त्ये समद समजलं, आता आम्हास्नी आमच्या गावात दारूबंदी...

06.00 PM

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्जमुक्तीवरून राज्य सरकारवर पुन्हा शरसंधान केले आहे. राज्यात कर्जमुक्तीची...

05.33 AM

मुंबई - कोकण परिसरात भाजपला अपेक्षित यश मिळत नसल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना पक्षात घेतले जाणार हे निश्‍चित आहे...

04.45 AM