पुणे आणि नाशिक थंडीने गारठले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

पुणे - राज्यात पुणे आणि नाशिक थंडीने गारठले असून, पुढील दोन दिवसांमध्ये थंडीचा कडाका वाढण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत या दोन्ही शहरांमध्ये आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुण्यातील या हंगामातील सर्वांत नीचांकी तापमानाची नोंद आज झाली. 

उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे. तेथून महाराष्ट्राच्या दिशेने थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान सरासरीपेक्षा कमी झाले आहे. पुढील चोवीस तासांमध्ये राज्यातील हवामान कोरडे राहणार असल्याने थंडीची तीव्रता वाढणार आहे, असे हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले. पुण्यात किमान तापमानाचा पारा 2.5 अंश सेल्सिअसने कमी होऊन आठ अंश सेल्सिअस नोंदला गेला. यंदाच्या हिवाळ्यात नोव्हेंबरमध्ये किमान तापमान 8.3 अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरले होते. पुढील दोन दिवसांत किमान तापमान 7 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्ती केली आहे. 

विदर्भात थंडीची लाट असून, तेथील शहरात किमान तापमानाचा पारा दोन ते चार अंश सेल्सिअसने कमी झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीचा कडाका कायम आहे. तेथेही पुढील दोन दिवसांमध्ये थंडी वाढेल.

महाराष्ट्र

मुंबई - देश बलशाली बनवण्यासाठी सर्वांनी दुष्काळापासून मुक्ती, शेतकऱ्यांना कर्जापासून मुक्ती, समाजाला प्रदूषणापासून मुक्ती,...

03.03 AM

सातारा - मूळचे तडवळे संमत कोरेगाव (ता. कोरेगाव) येथील रहिवाशी व सध्या नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रतापसिंह...

02.33 AM

मुंबई -  शिवसेनेच्या कॅबिनेट, राज्यमंत्र्यांची शुक्रवारी (ता. १८) शिवसेना भवन येथे पक्षाच्या वतीने बैठक बोलावली आहे. या...

02.00 AM