थंडीच्या लाटेने विदर्भ गारठला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

पुणे - उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्यामुळे राज्यातील किमान तापमानात घट झाली आहे. विदर्भातील अनेक भागांत थंडीची लाट आली असून, किमान तापमान सरासरीच्या तुलनेत पाच अंशांपर्यंत घटले आहे.

पुणे - उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्यामुळे राज्यातील किमान तापमानात घट झाली आहे. विदर्भातील अनेक भागांत थंडीची लाट आली असून, किमान तापमान सरासरीच्या तुलनेत पाच अंशांपर्यंत घटले आहे.

बुधवारी नागपूर येथे 7.8; तर नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे 8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चांगलीच घट झाली. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. कोकणातील किमान तापमानात चढउतार सुरू आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. पुणे परिसरात येत्या रविवारपर्यंत (ता. 31) पुणे परिसरात आकाश मुख्यत निरभ्र राहील.

Web Title: pune maharashtra news cold increase in vidarbha