पुणे जिल्ह्यात 38 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी 

पुणे जिल्ह्यात 38 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी 

पुणे - "छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान' योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात 38 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली असून, त्यात दौंड तालुक्‍यातील सर्वाधिक 8 हजार शेतकऱ्यांना 50 कोटी 5 लाख रुपयांची रक्कम मिळाली आहे. तर खेड तालुक्‍यात नियमित कर्जफेड करणाऱ्या सुमारे 12 हजार 407 शेतकऱ्यांना 17 कोटी 69 लाख रुपयांचा "प्रोत्साहनपर लाभ' मिळाला आहे. मुळशी (781) आणि वेल्हा (710) तालुक्‍यात कर्जमाफीचे लाभार्थी सर्वांत कमी असून, वेल्हा तालुक्‍यातील केवळ 770 शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ देण्यात आला आहे. 

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक (पीडीसीसी) आणि विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 38 हजार 915 थकबाकीदार शेतकऱ्यांना  207 कोटी 47 लाख व 60 हजार 885 जणांना प्रोत्साहनपर लाभापोटी 104 कोटी 25 लाख रुपयांची रक्कम खात्यात जमा करण्याचे काम सुरू आहे. कर्जाचे पुनर्गठन केलेल्या 1031 शेतकरी सभासदांनाही 4 कोटी 21 लाख रुपये इतक्‍या रकमेचा लाभ देण्यात आला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या कर्जदार शेतकऱ्यांची माहिती प्राप्त करून घेतली जात आहे. 

पहिल्या टप्प्यात पुणे जिल्हा बॅंकेच्या 99 हजार 800 सभासद शेतकऱ्यांना 311 कोटी 71 लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. त्यात थकीत कर्जदारांची खाती कोरी (शून्य) करण्याबरोबरच नियमित परतफेड करणारे आणि कर्जाचे पुनर्गठन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभाची रक्कमदेखील देण्यात आली आहे. 
- आनंद कटके, जिल्हा सहकार उपनिबंधक (ग्रामीण) 

कर्जमाफीची आकडेवारी 
तालुका शेतकरी संख्या रक्कम (कोटीत) 
आंबेगाव 1341 5.90 
बारामती 5934 35.71 
भोर 2857 14.07 
दौंड 8544 50.05 
हवेली 1182 6.57 
इंदापूर 7267 34.97 
जुन्नर 925 4.68 
खेड 1971 8.36 
मावळ 2655 14.45 
मुळशी 781 2.57 
पुरंदर 14.42 7.70 
शिरूर 33.06 19.53 
वेल्हा 710 2.85 
----------------------------------------------------- 
एकूण 38915 207.47 

प्रोत्साहन लाभाची आकडेवारी 
तालुका शेतकरी संख्या रक्कम (कोटीत) 
आंबेगाव 5630 9.19 
बारामती 6012 11.27 
भोर 4681 7.99 
दौंड 3578 7.36 
हवेली 1760 3.09 
इंदापूर 3613 7.44 
जुन्नर 7007 11.69 
खेड 12407 17.69 
मावळ 2596 4.38 
मुळशी 1209 1.91 
पुरंदर 4337 7.60 
शिरूर 7285 13.42 
वेल्हा 770 1.19 
------------------------------------------------------- 
एकूण 60885 104.25 
--------------------------------------------------------- 
(स्रोत ः राज्य सहकार आयुक्तालय, पुणे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com