जीएसटीमुळे राज्य सरकारला 15 हजार कोटींचे अधिक उत्पन्न 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

पुणे - ""राज्यामध्ये मूल्यवर्धित कर (व्हॅट) भरणारे फक्त 70 हजार व्यापारी होते; मात्र वस्तू व सेवा कराची  (जीएसटी) अंमलबजावणी सुरू झाल्यापासून कर भरणाऱ्या नोंदणीकृत व्यापाऱ्यांचा हा आकडा अडीच लाखांवर गेला आहे. त्यामुळे राज्याला पुढील वर्षी दहा ते पंधरा हजार कोटी रुपयांचे अधिक उत्पन्न मिळेल'', अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, ""जीएसटी लागू झाल्यानंतर अनेकांना वाटत होते, की यातून मोठे नुकसान होईल. महाराष्ट्र हे "मॅन्युफॅक्‍चरिंग' राज्य असल्यामुळे आम्हाला कर उत्पन्न घटण्याची चिंता होती; पण गेल्या दोन महिन्यांमध्येच राज्यात "जीएसटी'चे लक्ष पूर्ण झाले आहे. '' 

जीएसटीमध्ये चोरीला वाव नाही, पूर्ण पारदर्शकता आहे आणि इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीने कर भरता येतो. यापूर्वी देशात तीन कोटी लोक कर भरत होते व त्यातील एक कोटी व्यक्तीच खऱ्या अर्थाने कर भरायच्या. आता कर भरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढून सहा कोटी तीस लाखांवर गेली आहे. सरकारच्या तिजोरीत येणाऱ्या या पैशाचा वापर पुन्हा गरिबांच्या कल्याणकारी योजनांसाठी केला जातो. काळ्या पैशावर खऱ्या अर्थाने टाच आणण्याचे काम भाजप सरकारने केले असल्याचेही यांनी सांगितले.