मी पाहिलंय, दाभोलकरांची निर्घृण हत्या होताना..!

मी पाहिलंय, दाभोलकरांची निर्घृण हत्या होताना..!
मी पाहिलंय, दाभोलकरांची निर्घृण हत्या होताना..!

पुणेः अंधश्रध्देविरुध्द दोन तपे लढणारा, विवेकाच्या पायवाटेवरुन चालणारा आणि कुप्रथा व अघोरी चालीरीतींचा अंधार मिटविण्यासाठी जनमानसांत विज्ञानप्रकाश फुलवणारा ज्ञानसूर्य म्हणजेच... डॉ. नरेंद्र दाभोलकर.

डॉ. दाभोलकर यांची हत्या झाली; पण त्यांच्या विचारांची हत्या कुणी करू शकत नाही. हे विचार चिरकाल टिकणारे आहेत. आजची नवी पिढी त्यांच्या विचारांना सोबत घेऊन पुढे जात आहे. हा डॉक्टरांच्या विवेकरूपी विचारांचाच विजय आहे. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजात विवेक जागृतीचे काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या वतीने ही कविता आपण डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अर्पण करत असल्याचे लेखक, पत्रकार व व्याख्याते संदीप चव्हाण यांनी सांगितले.

यामागची संकल्पना व सादरीकरण संदीप चव्हाण यांचे असून, 'सकाळ' च्या पुणे आवृत्तीत ते उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. हरिभाऊ पागिरे, समीर नेर्लेकर यांची ही निर्मिती असून, या कवितेच्या व्हिडिओची तांत्रिक बाजूदेखील त्यांनीच सांभाळली आहे. हे दोघेही शिवाजीनगर (पुणे) येथील मॉडर्न महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागात दृश्य, कला, तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com