रायगड किल्ल्यावरील ढोलवादनाचा कार्यक्रम रद्द 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त येत्या 11 एप्रिल रोजी किल्ले रायगडावर आयोजित केलेला ढोलवादनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज स्पष्ट केले. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथिनिमित्त येत्या 11 एप्रिल रोजी रायगडावर छत्रपतींना मानवंदना देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळच्या वतीने होणार आहे. या समारंभात रायगडावर तोफांची सलामी देण्यात येते, याचवेळी ढोलवादनातून शिवाजी महाराजांना सलामी देण्याची विनंती काही मंडळांनी केली होती. त्यादृष्टीने या समारंभात जास्तीत जास्त ढोल पथकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते; परंतु काही शिवप्रेमी संघटनांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली. त्यामुळे रायगड किल्ल्यावरील फक्त ढोलवादनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. याप्रसंगी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसंधुराराजे उपस्थित राहणार आहेत, असे विनोद तावडे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.