रेल्वेचे खासगी ॲपवरील आरक्षण महागले

Railway
Railway

पुणे - पेटीएम किंवा तत्सम गेटवेद्वारे रेल्वेचे आरक्षण केल्यास आता प्रतितिकीट १२ रुपये आणि कर प्रवाशांना अतिरिक्त द्यावा लागणार आहेत. रेल्वे प्रशासनाच्या ‘इंडियन रेल्वे केटरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड’ने याबाबत माहिती नुकतीच जाहीर केली आहे. तसेच काही राष्ट्रीयकृत बॅंकांच्या माध्यमातून ऑनलाइन आरक्षण केल्यास प्रतिव्यवहाराला दहा रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. मात्र, काही बॅंकांना अतिरिक्त शुल्कातून वगळले आहे. 

रेल्वेचे आरक्षण ऑनलाइन करण्याचे प्रमाण वाढत आहे. पेटीएम किंवा मेक माय ट्रीप डॉट कॉम, यात्रा आदी ॲपद्वारे होणाऱ्या व्यवहारांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘आयआरटीसी’ने सुधारित शुल्क जाहीर केले आहे. त्यानुसार खासगी कंपन्यांच्या गेटवेद्वारे आरक्षण केल्यास प्रतीतिकिट १२ रुपये, तर राष्ट्रीयकृत बॅंकांच्या डेबिट कार्डद्वारे व्यवहार केल्यास प्रती व्यवहार दहा रुपये शुल्क आणि त्यावर कर आकारण्यात येईल. नेट बॅंकिंगद्वारेही व्यवहार केल्यास प्रतिव्यवहार दहा रुपये शुल्क असेल, असे ‘आयआरटीसी’ने म्हटले आहे. याबाबत रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षा शहा म्हणाल्या, ‘‘डिजिटल इंडियाकडे प्रवासी वळत असताना, असे जादा चार्ज लावल्यास आरक्षण केंद्रांपुढे पुन्हा रांगा लागतील. चार जणांच्या कुटुंबाचे तिकीट पेटीएमवरून आरक्षित केल्यास किमान १०० रुपयांचा भुर्दंड पडेल. त्यामुळे याचा फेरविचार होण्याची गरज आहे.’’ 

नेट बॅंकिंग, क्रेडिट कार्ड अथवा खासगी गेटवे बाबतच्या शुल्काची माहिती प्रवाशांना https://www.irctc.co.in/eticketing/bankTxnCharge.jsf  या संकेतस्थळावर मिळेल.

भीम ॲपला सूट
रेल्वे तिकीट आरक्षणासाठी केंद्र सरकारच्या भीम ॲप किंवा यूपीआयद्वारे प्रवाशांनी व्यवहार केल्यास त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क किंवा कर आकारण्यात येणार नसल्याचेही ‘आयआरटीसी’ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com