उद्यापासून सर्वदूर पावसाचा अंदाज 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

पुणे - अरबी समुद्रातील ठळक कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव दक्षिण महाराष्ट्रात जाणवू लागला आहे. बुधवारपर्यंत (ता. ३०) या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर उद्या, बुधवारपासून (ता. ३०) राज्यात सर्वदूर पूर्वमोसमी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

अरबी समुद्रात केरळ किनारपट्टीलगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी आणखी तीव्र झाले आहे. पश्‍चिम किनारपट्टीलगतच्या अरबी समुद्रावर ढगांची गर्दी झाली आहे. त्यामुळे बुधवारपर्यंत केरळ, कर्नाटक, गोवा आणि कोकण किनारपट्टीलगत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून, ताशी ६० किलोमीटर वेगाने वाऱ्याचे झाेत येणार आहेत. त्यामुळे उंच लाटा उसळून समुद्र खवळणार असल्याने मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

मध्य प्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीपासून विदर्भ, मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. अरबी समुद्रातून होत असलेल्या बाष्प पुरवठ्यामुळे कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रातही ढग जमा होत आहेत. दोन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात जोरदार वारे, मेघर्गनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 

सोमवारी (ता. २८) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.६, जळगाव ४४.२, कोल्हापूर ३६.३, महाबळेश्वर ३१.७, मालेगाव ४४.२, नाशिक ४०.३, सांगली ३५.४, सातारा ३६.७, सोलापूर ४०.१, मुंबई ३४.५, अलिबाग ३३.९, रत्नागिरी ३४.२, डहाणू ३६.१, आैरंगाबाद ३९.५, परभणी ३४.३, नांदेड ४२.५, अकोला ४५.०, अमरावती ४३.८, बुलडाणा ४१.५, ब्रह्मपुरी ४२.३, चंद्रपूर ४२.४, गोंदिया ४०.५, नागपूर ३८.८, वर्धा ४१.५, यवतमाळ ४२.०. 

Web Title: Rainfall forecast from tomorrow in maharashtra