राज्यात पावसाचा जोर वाढणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

पुणे - बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने राज्यात दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. उद्या (ता. २०) राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असून, कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. 

रविवारी सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. पाऊस पडण्यास पोषक स्थितीमुळे मंगळवारपर्यंत (ता. २१) विदर्भ, कोकणात बहुतांशी ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Web Title: Rains will increase in the maharashtra state