राज्यात निवडश्रेणीची 148 पदे चिन्हांकित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

औरंगाबाद - महाराष्ट्र सेवेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी संवर्गात आल्यावर पदोन्नतीच्या संधी अतिशय कमी प्रमाणात असतात. त्यामुळे या संवर्गात निर्माण झालेली कुंठितावस्था दूर करण्यासाठी या संवर्गातील निवडश्रेणी वेतनश्रेणीसाठी राज्यात 148 पदे चिन्हांकित करण्यात आली आहेत. 

 

औरंगाबाद - महाराष्ट्र सेवेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी संवर्गात आल्यावर पदोन्नतीच्या संधी अतिशय कमी प्रमाणात असतात. त्यामुळे या संवर्गात निर्माण झालेली कुंठितावस्था दूर करण्यासाठी या संवर्गातील निवडश्रेणी वेतनश्रेणीसाठी राज्यात 148 पदे चिन्हांकित करण्यात आली आहेत. 

 

उपमुख्य कार्यकारी अधिकारी-गटविकास अधिकारी संवर्गातील त्या त्या वेळी मंजूर पदांपैकी 20 टक्के पदांऐवजी 33.33 टक्के पदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (निवडश्रेणी) मध्ये रूपांतरित करण्यास याआधी 2013 मध्ये मान्यता दिलेली आहे. आता विभागीय आयुक्त कार्यालयातील सहायक आयुक्त (विकास, चौकशी, तपासणी) ही पदे आणि जिल्हा परिषद पंचायत समित्यांमधील अधिकाऱ्यांची एकूण 148 पदे ही उपमुख्य कार्यकारी निवडश्रेणीकरिता चिन्हांकित करण्यात आली आहेत. उपमुख्य कार्यकारी अधिकारी-गटविकास अधिकारी (निवडश्रेणी) या संवर्गातील अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यासाठी पदे चिन्हांकित करण्यात आलेली असली तरी, सद्यःस्थितीत अशा चिन्हांकरिता पदांवर जे अधिकारी कार्यरत आहेत, ते निवडश्रेणीधारक नाहीत. तसेच या पदांवर निवडश्रेणीधारक अधिकारी उपलब्ध न झाल्यास निम्नश्रेणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार ग्रामविकास विभागास राहणार आहे. 

 

जिल्ह्याच्या ठिकाणी चिन्हांकित पंचायत समित्या 

जिल्ह्याच्या ठिकाणी गटविकास अधिकारी निवडश्रेणीमध्ये पंचायत समित्यांची पदे चिन्हांकित करण्यात आली आहेत. यामध्ये भिवंडी, पालघर, अलिबाग, रत्नागिरी, कुडाळ, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, हवेली, सातारा, मिरज, दक्षिण सोलापूर, करवीर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम, बुलडाणा, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांच्या ठिकाणच्या एकूण 34 पंचायत समित्यांचा समावेश करण्यात आला आहे. 

 

विभागवार पंचायत समित्या 

कोकण विभाग- मुरबाड, महाड, चिपळूण 

नाशिक विभाग- अकोले, बागलाण, अंमळनेर 

पुणे विभाग- खेड, पाटणी, बार्शी 

औरंगाबाद विभाग- कन्नड, गेवराई, भोकरदन, किनवट, जिंतूर 

अमरावती विभाग- चिखली, पुसद, दर्यापूर 

नागपूर विभाग- तुमसर, चिमूर, चामोर्शी, काटोल, तिरोडा 

 

चिन्हांकित केलेल्या पदांची संख्या 

* प्रत्येक विभागीय आयुक्त कार्यालयातील सहायक 

आयुक्ताची (विकास, चौकशी, तपासणी) तीन पदे...................................................18 

* प्रत्येक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी 

ग्रामपंचायतचे एक पद...............................................................................34 

* प्रत्येक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी 

सामान्य प्रशासन एक पद.............................................................................34 

* प्राचार्य, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, मांजरी पुणे, कोल्हापूर, 

जालना, परभणी, बुलडाणा, सिंदेवाही चंद्रपूर........................................................06