अकलूजमधील युवतीवर शिंगणापूर घाटात बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

शिखर शिंगणापूर - आपल्या मित्रासोबत फिरायला आलेल्या अकलूज येथील महाविद्यालयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना काल उघडकीस आली. याप्रकरणी दोघांवर नातेपुते पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एकाला अटक झाली आहे. संशयितांनी या दोघांची मोबाईलवर अश्‍लील चित्रफीत तयार केली असून, मुलीच्या अंगावरील दागिने लुटले आहेत. 

शिखर शिंगणापूर - आपल्या मित्रासोबत फिरायला आलेल्या अकलूज येथील महाविद्यालयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना काल उघडकीस आली. याप्रकरणी दोघांवर नातेपुते पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एकाला अटक झाली आहे. संशयितांनी या दोघांची मोबाईलवर अश्‍लील चित्रफीत तयार केली असून, मुलीच्या अंगावरील दागिने लुटले आहेत. 

नातेपुते पोलिसांनी सांगितले, की आठ मार्च रोजी अकलूज येथील महाविद्यालयातील प्रेमी युगुल कॉलेजला दांडी मारून शिंगणापूर येथे फिरावयास आले होते. ते माघारी जात असताना येथील भवानी घाटात नातेपुते येथील सुनील मारुती माने व त्याच्या मित्राने त्यांना अडवले. धाक दाखवून रस्त्यापासून काही अंतरावर नेले. तेथे त्यांना मारहाण करून व धाक दाखवून विवस्त्र केले. दोघांना सक्तीने शरीरसंबंध ठेवायला भाग पाडून त्याची मोबाईलमध्ये चित्रफित तयार केली. त्यानंतर या दोघा नराधमांनी संबंधित मुलीवर सामूहिक बलात्कार केला. तिच्या अंगावरील दागिने व दोघांचे मोबाईल काढून घेतले आणि त्यांना सोडून दिले. 

एवढ्यावर न थांबता दुसऱ्या दिवशी त्यांनी मुलीच्या मित्राला फोन करून चित्रफीत डिलीट करण्यासाठी दहा हजारांची मागणी केली. मुलीच्या मित्राने पैसे देतो, असे सांगून सुनील माने यास अकलूजला बोलावून घेतले. तेथे आपल्या इतर मित्रांच्या मदतीने त्याची धुलाई केली. सुनील माने याने नातेपुते पोलिस स्टेशनला फोन करून अकलूज येथे मला मारहाण होत असून, पोलिस संरक्षणाची मागणी केली. नातेपुते पोलिसांनी तातडीने यासंदर्भात अकलूज पोलिस स्टेशनला कळविले व माने यास ताब्यात घेण्यास सांगितले. नंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही संपूर्ण घटना उघडकीस आली. 

यासंदर्भात नातेपुते पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील माने यास अटक करण्यात आली आहे. त्याच्या फरारी साथीदाराचा तपास सहायक पोलिस निरीक्षक खेडेकर, फौजदार देवकाते व जाधव करीत आहेत. यातील मुख्य संशयित सुनील माने हा सराईत गुन्हेगार आहे. दोन वर्षांपूर्वी नातेपुते पोलिसांनी त्याच्या विरोधात हद्दपारीचा प्रस्ताव पाठविला होता. 

Web Title: Raped the girl on the Shinganapur ghat