महाराष्ट्रातही "व्यापमं'चा धोका? 

महाराष्ट्रातही "व्यापमं'चा धोका? 

नाशिक - सरकारी नोकरभरतीच्या सदोष पोर्टलच्या आधारे मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात आगामी 72 हजार पदांच्या भरतीत गैरव्यवहार होऊ शकतो. त्यामुळे सरकारी सेवेतील कर्मचारी भरतीच्या राज्य सरकारच्या सदोष महापरीक्षा पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवू नये, असा इशारा देऊन शुक्रवारी भारतीय विद्यार्थी मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले. 

राज्य सरकारचे महापोर्टल सदोष आहे. राज्यात लवकरच 72 हजार जागांची मेगाभरती होणार असून, सदोष महापोर्टलद्वारे ही भरती झाल्यास मध्य प्रदेशातील व्यापमं गैरव्यवहाराप्रमाणे महाराष्ट्रात लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय होईल, अशी टीका करून शुक्रवारी भारतीय विद्यार्थी मोर्चातर्फे महापरीक्षा पोर्टलविरोधात आंदोलन केले. उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना निवेदन दिले. 

ऑफलाइन परीक्षेची मागणी 
राज्यात आगामी काळात 72 हजार जागांची मेगाभरतीप्रक्रिया राबविली जाणार आहे. सदोष महापोर्टलद्वारे ही भरती राबवली गेल्यास राज्यातील हजारो तरुणांचे भवितव्य धोक्‍यात येणार आहे. मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळ्याची महाराष्ट्रात पुनरावृत्ती होण्याचा धोका असल्याने पोर्टल रद्द करून सर्व विभागाच्या ऑफलाइन पद्धतीने एकाच दिवशी परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी भारतीय विद्यार्थी मोर्चाने केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com