मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रिपद सोडावे - उद्धव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 सप्टेंबर 2016

मुंबई - "सरकार माझं आहे असा विश्‍वास पोलिसांना वाटला पाहिजे, त्यासाठी महाराष्ट्राला स्वतंत्र गृहमंत्री हवा,‘ अशी मागणी करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्रिपद सोडण्याचा सल्ला दिला. समाजात पोलिसच असुरक्षित असतील, तर आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत याचा विचार केला पाहिजे, असा टोला लगावत त्यांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी आज फडणवीस यांची "वर्षा‘ निवासस्थानी पोलिसांच्या कुटुंबीयांसह भेट घेतली. या भेटीत प्रामुख्याने पोलिसांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. या भेटीनंतर ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ""मुख्यमंत्री सक्षम आहेत, पण गेल्या काही दिवसांत त्यांच्या कामाचा व्याप खूप वाढला आहे. महाराष्ट्रात पोलिसांवर होत असलेले हल्ले लक्षात घेता गृहमंत्रिपदासाठी स्वतंत्र कारभार असावा, असे माझे स्पष्ट मत आहे.‘‘

"पोलिसांच्या तक्रारींच्या निवारणासाठी एक समिती स्थापन करण्याची सूचना फडणवीस यांनी मान्य केली आहे. या समितीमध्ये पोलिसांच्या कुटुंबीयांचे प्रतिनिधी, वरिष्ठ पोलिस अधिकारी व लोकप्रतिनिधींचा समावेश असेल. पोलिसांवरील हल्ले, अनुकंपा तत्त्व, कामाच्या वेळा, पोलिसांचे आरोग्य आदी समस्यांवर उपाय शोधण्याचे काम ही समिती करेल,‘ असेही ठाकरे म्हणाले.

या समितीच्या माध्यमातून पोलिसांच्या समस्यांचा आढावा घेऊन पुढील मार्ग काढला जाणार आहे. पोलिसांच्या घरांचा प्रश्‍न, अनुकंपा तत्त्वावरील नोकऱ्यांचा प्रश्‍न, तसेच पोलिसांबाबत एखादी दुर्घटना घडली, तर तत्काळ जवळच्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचार मिळावेत याबाबतही या वेळी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: Release state Home Minister - Uddhav