"रिपब्लिकन जनशक्ती' शिवसेनेबरोबर जाणार 

दीपा कदम - सकाळ न्यूज नेटवर्क 
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

मुंबई - रिपब्लिकन पक्षातून (आठवले गट) बाहेर पडलेल्या रिपब्लिकन जनशक्‍ती संघटनेने शिवसेनेला पाठिंबा दिला असून, कोणत्याही अटींशिवाय शिवसेनेच्या "धनुष्यबाण' या चिन्हाखाली ही संघटना निवडणूक लढविणार आहे.

दलित मतांचे प्राबल्य असलेल्या ईशान्य मुंबईतील तीन ते चार जागा या संघटनेला देण्याची प्राथमिक तयारी शिवसेनेने दाखवली आहे, तर राज्यातील इतर महापालिकांमध्येही जवळपास 30 जागांवर या संघटनेचे उमेदवार शिवसेनेच्याच चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. 

मुंबई - रिपब्लिकन पक्षातून (आठवले गट) बाहेर पडलेल्या रिपब्लिकन जनशक्‍ती संघटनेने शिवसेनेला पाठिंबा दिला असून, कोणत्याही अटींशिवाय शिवसेनेच्या "धनुष्यबाण' या चिन्हाखाली ही संघटना निवडणूक लढविणार आहे.

दलित मतांचे प्राबल्य असलेल्या ईशान्य मुंबईतील तीन ते चार जागा या संघटनेला देण्याची प्राथमिक तयारी शिवसेनेने दाखवली आहे, तर राज्यातील इतर महापालिकांमध्येही जवळपास 30 जागांवर या संघटनेचे उमेदवार शिवसेनेच्याच चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. 

विधानसभा निवडणुकीच्या वेळेस रिपब्लिकन पक्षातून (आठवले गट) बाहेर पडलेले दलित अभ्यासक अर्जुन डांगळे यांच्या गटाने रिपब्लिकन जनशक्‍ती संघटना स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या या संघटनेने महापालिका निवडणुकीतही शिवसेनेबरोबरच राहण्याचा निर्णय केला आहे. याविषयी "सकाळ'कडे प्रतिक्रिया व्यक्‍त करताना अर्जुन डांगळे म्हणाले, की शिवसेनेबरोबर केवळ उमेदवारी मिळवण्यासाठी आम्ही जात नाही. शिवसेनेबरोबर जाण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे प्रादेशिक पक्षांना बळकटी मिळावी असे आमच्या संघटनेचे धोरण आहे. शिवसेना या मातीतला एकमेव प्रादेशिक पक्ष आहे, जो मराठी माणसाच्या प्रश्‍नांतून निर्माण झालेला आहे. तसेच आंबेडकरी जनतेचे प्रश्‍न सोडविण्याची शिवसेनेची भूमिका आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वपैशाने बांधलेले आंबेडकर भवन आणि प्रिंटिंग प्रेस या सरकारने कारस्थान करून पाडली, त्या वेळी शिवसेनेने सरकारच्या विरोधात भूमिका घेत याचा निषेध केला. 

महापालिका निवडणुकीसाठी कोणाबरोबरही युती न करण्याचे धोरण शिवसेनेने स्वीकारलेले असले तरी रिपब्लिकन जनशक्‍ती संघटनेला मित्रपक्ष म्हणून सामावून घेण्याचे पक्षाचे धोरण आहे. याविषयी भूमिका स्पष्ट करताना डांगळे म्हणाले, की आमच्या संघटनेला अद्याप निवडणूक चिन्ह मिळालेले नाही. कोणाबरोबरही युती करायची नाही या शिवसेनेच्या धोरणाचे आम्ही स्वागतच करतो; पण दलित आणि बहुजन समाजाची मते शिवसेनेला मिळावीत, यासाठी आमची जिथे ताकद आहे तिथे आम्ही जोर लावू. राज्यातील दहा महापालिकांमध्ये प्रत्येक ठिकाणी आम्हाला तीन ते चार जागा देण्याची तयारी शिवसेनेने दाखवली आहे. मुंबईत घाटकोपर आणि चेंबूर या भागातील चार जागा आम्ही शिवसेनेच्या चिन्हावरच लढवू. मात्र, याविषयीचा अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र

मुंबई : काँग्रेस सोडून ज्यांना जायचे असेल त्यांनी खुशाल जावे. अशा दलबदलू लोकांची पक्षाला गरज नाही. असे संधिसाधू पक्षांतर करीत...

10.54 AM

मुंबई - राज्य सरकारच्या विक्रीकर विभागातल्या कामगिरीवर महालेखापालांनी (कॅग) अनेक प्रकरणांत नाराजी व्यक्‍त केलेली असतानाच...

05.03 AM

मुंबई - राज्यातील बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्यास उच्च न्यायालयाने आज पुन्हा मनाई केली. बैलांना शर्यतीदरम्यान इजा होणार...

03.57 AM