रिझर्व्ह बॅंकेचा जुन्या नोटा बदलण्यास नकार 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 5 जानेवारी 2017

मुंबई - चालू वर्षातील 31 मार्चपर्यंत शपथपत्रावर जुन्या पाचशे आणि हजारांच्या नोटा बदलून मिळतील, या आशेवर बसलेल्या नागरिकांना नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बॅंकेने नकार दिला आहे. केंद्र सरकारच्या अध्यादेशानुसार रिझर्व्ह बॅंकेने अनिवासी भारतीयांनाच जुन्या नोटा बदलण्याची सुविधा दिल्याने जनतेमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. दरम्यान, याबाबत रिझर्व्ह बॅंकेशी संपर्क साधला असता हा वटहुकूम केंद्र सरकारने काढला असून, त्याचे बॅंकेकडून पालन केले जात आहे. जुन्या नोटा बदलण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारच्या अखत्यारीत असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला केलेल्या भाषणात नागरिकांना जुन्या नोटा शपथपत्रावर 31 मार्चपर्यंत रिझर्व्ह बॅंकेत बदलून घेता येतील, असे म्हटले होते. केंद्र सरकारने 30 डिसेंबरला रात्री काढलेल्या अध्यादेशात मात्र नोटाबंदीच्या 50 दिवसांत विदेशात असलेल्या भारतीयांना 31 मार्च दरम्यान रिझर्व्ह बॅंकेत जुन्या नोटा बदलून घेता येतील. याशिवाय 30 जूनपर्यंत अनिवासी भारतीयांना जुन्या नोटा बदलता येणार असल्याचे म्हटले आहे. अनिवासी भारतीय वगळता इतरांच्या जुन्या नोटा बदलता येणार नसल्याने नागरिकांमध्ये पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे. गेल्या तीन दिवसांत रिझर्व्ह बॅंकेच्या मुंबईतील मुख्यालयात जुन्या नोटा घेऊन आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाती परतावा लागले आहे. जुन्या नोटा बदलून देण्यासंदर्भात सरकारने अधिक स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

अध्यादेशाचा गोंधळ कायम 
नोटाबंदीच्या काळात केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेने काढलेल्या विविध अध्यादेशांनी गोंधळात भर घातली होती. यात काही वादग्रस्त अध्यादेश काही तासांत मागे घेण्यात आले होते. काही अध्यादेश नव्याने सुधारितपणे जारी करण्यात आले. नोटाबंदीची मुदत संपूनही अध्यादेशाचा गोंधळ संपलेला दिसत नाही. 

केंद्र सरकारच्या 30 डिसेंबरच्या अध्यादेशानुसार नोटाबंदीच्या कालावधीत विदेशात असलेल्या भारतीयांना 31 मार्चपर्यंत आणि अनिवासी भारतीयांना 30 जूनपर्यंत नोटा बदलून दिल्या जातील. हा अध्यादेश सरकारने काढला असून, त्याचे बॅंकेकडून पालन केले जात आहे. जुन्या नोटा बदलण्यास मुदतवाढ द्यावी की नाही, ही सरकारच्या अखत्यारितील बाब आहे. 
- अल्पना किलावाला, जनसंपर्क विभाग प्रमुख, रिझर्व्ह बॅंक 

महाराष्ट्र

मुंबई, - विविध मागण्यांसाठी सार्वजनिक बँकांची शिखर संघटना असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने आज (मंगळवारी) एकदिवसीय...

09.27 AM

मुंबई - खरीप हंगामात राज्य सरकारने जाहीर केलेली तातडीची दहा हजार रुपयांची उचल राज्यातील फक्त २४ हजार शेतकऱ्यांना मिळाली आहे...

04.33 AM

पुणे - राज्यात स्वाइन फ्लूने अत्यवस्थ झालेल्या सर्वाधिक रुग्णांची संख्या पुण्यात असल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे सोमवारी...

04.12 AM