#SakalForMaharashtra ‘एकत्र येऊया...’साठी मान्यवरांचा प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

हे अभियान कोणत्याही जातीधर्मापुरते मर्यादित नसून गरजूंना मदत करण्यासाठी सर्वच समाजघटकांनी पुढे यावे, अशी अपेक्षा आहे. 

महाराष्ट्र घडविण्याच्या या कामात आपण काय सहभाग देऊ इच्छिता?  
आमच्यापर्यंत पोचवा #SakalForMaharashtra हा हॅशटॅग वापरून.
ई-मेल कराः  webeditor@esakal.com  
Call Center : 9225800800

राज्यात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘एकत्र येऊया! मार्ग काढूया!!’ या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर व सामाजिक संस्थांकडून या अभियानाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. याबाबत मान्यवरांच्या प्रतिक्रिया...

#SakalForMaharashtra

खेळांविषयी विविध संघटना आज कार्यरत आहेत. परंतु, त्या केवळ संघटनांपुरतेच मर्यादित राहात आहेत. या सर्व संघटनांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. त्यातून सर्व प्रकारच्या खेळांना पुढे जाण्यास मार्गदर्शन होईल. 
- अविनाश ओंबासे, सदस्य, राज्य क्रीडा धोरण समिती, महाराष्ट्र शासन 

कायद्याविषयी केवळ कायदेविषयक काम करणाऱ्या व्यक्तींना माहिती असते, मात्र, सर्वसामान्य नागरिकांना त्याची माहिती नसते. ती असणे आवश्‍यक आहे. यासाठी वकिलांची संघटना काम करते.
ॲड. शिरिष देशपांडे, वकील 

मुरबाड तालुक्‍यातील आदिवासी विद्यार्थ्यांना विनासायास शिक्षण मिळावे, यासाठी अंबरनाथची स्पंदन संस्थेने पुढाकार घेतला आहे. तीन टप्प्यात वीस शाळांत हॅपी स्कूल बनवण्याचे संस्थेने ठरवले आहे, तीन टप्प्यांत शाळांना सुविधा पुरवण्यात येताल. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना दप्तरे, स्टेशनरी, वह्या आणि चप्पल पुरवणे, दुसऱ्या टप्प्यात शाळेला संगणक आणि शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी वॉटर फिल्टर, तिसऱ्या टप्प्यात विद्यार्थिनींसाठी स्पंदन आणि रोटरी क्‍लबच्या सहकार्याने शाळेत स्वच्छतागृह उभारणार. प्रत्येक आदिवासी शाळा हॅपी स्कूल बनवणार. 
- डॉ. राहुल चौधरी, अध्यक्ष स्पंदन फाउंडेशन, अंबरनाथ  

आजच्या परिस्थितीत मराठा तरुण, तरुणींचे पालक खूपच तणावाखाली आहेत. शिक्षणासाठी मोठी फी भरू शकत नाहीत, नेते मंडळीकडून योग्य मार्गदर्शन नाही. आर्थिक टंचाई, शेतीतून खात्रीशीर उत्पन्न नाही. मुले निराश होऊ नयेत, यासाठी ‘सदाबहार फाउंडेशन‘ कौन्सिलिंग व मोटिव्हेशन तसेच मोफत व्यवसाय मार्गदर्शन करते. आमचे फाउंडेशन मुलांच्या पाठीशी आहे.
- सुभाष पाटील, सदाबहार सोशल फाउंडेशन, चिंचवड.

संबंधित बातम्या :
#SakalForMaharashtra एकत्र येऊया ! मार्ग काढूया !!
#SakalForMaharashtra मी तयार आहे, आपणही पुढे या!​
#SakalForMaharashtra कामगार कौशल्य विकास काळाची गरज: श्रीकांत परांजपे
#SakalForMaharashtra ‘एकत्र येऊया...’साठी सरसावले लाखो हात

Web Title: Responses to Sakal for Maharashtra Come Together