Grocery
Grocery

रिटेल व्यवसायात ॲमेझॉनच्या प्रवेशामुळे किराणा युद्ध भडकणार

मुंबई - ‘वॉलमार्ट’पाठोपाठ ‘ई-कॉमर्स’मधील महाकाय कंपनी असलेलल्या ‘ॲमेझॉन’ने आदित्य बिर्ला समूहाचे ‘मोअर’ सुपरमार्केट्‌स खरेदी करत किराणा व्यवसायात पाऊल टाकले आहे. परस्परांशी स्पर्धा करणाऱ्या या दोन कंपन्यांच्या ‘रिटेल’ व्यवसायातील शिरकावामुळे बिग बझार, डी-मार्ट, रिलायन्स रिटेलसारख्या विद्यमान रिटेलर्स तसेच ऑनलाइन किराणा विक्रेत्यांना आव्हान मिळेल. त्यामुळे किराणा मालासह सौंदर्य प्रसाधने, कपडे, चैनीच्या आणि घरगुती वापराच्या वस्तूंच्या खरेदीवर ५० टक्‍क्‍यांपर्यंत सवलती, एका वस्तूच्या खरेदीवर दुसरी मोफत सारख्या घोषणांद्वारे ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या सुपरमार्केट्‌स दरम्यानचे व्यापार युद्ध तीव्र होण्याची शक्‍यता आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना स्वकमाईला (मार्जिन) कात्री लावून सवलतींचीही खैरात करावी लागेल. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचाच फायदा होणार आहे.

छापील किंमतींपेक्षाही कमी किंमत, फेस्टिव्हल ऑफर्स, होम डिलेव्हरी, लॉयल्टी बोनस यासारख्या सवलत योजनांमुळे सुपर मार्केट्‌समधून महिनाभराचा किराणा भरणाऱ्यांची संख्या दिवसागणीक वाढत आहे. सणासुदीला सुपरमार्केट्‌समधील उलाढाल कोट्यावधींनी वाढत असल्याने वॉलमार्टपाठोपाठ ॲमेझॉननेही ‘रिटेल’कडे मोर्चा वळवला आहे. ऑनलाईन मंचावर मोठ्या सवलतींच्या दरात वस्तूंची विक्री करण्यात ॲमेझॉनचे वर्चस्व आहे. तर किराणा व्यवसायात वॉलमार्ट अमेरिकेतील बडे प्रस्थ समजले जाते. ‘वॉलमार्ट‘ने नुकतीच फ्लिपकार्टवर ताबा मिळवत- ई-कॉमर्समधील दावेदारी मजबूत केली होती. या पार्श्‍वभूमीवर ॲमेझॉनने ‘मोअर’ खरेदी करून रिटेल व्यवसायात धडक दिली आहे. ॲमेझॉनने सामारा कॅपिटलच्या सहाय्याने ‘मोअर’ची ४ हजार २०० कोटी रुपयांना खरेदी केली आहे. ‘मोअर‘ची देशभरात जवळपास ५०० दालने असून त्यावर यापुढे ॲमेझॉन ताबा असेल. पुढील वर्षात आणखी १०० स्टोअर्स सुरू करण्याचा ॲमेझॉनचा मानस आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com