सेवानिवृत्तीचे वय 60 चा "जीआर' बनावट

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 10 मे 2017

मुंबई - सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय 58 वरून 60 केल्याबाबतचा सोशल मीडियामध्ये फिरत असलेला शासन निर्णय बनावट असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.

मुंबई - सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय 58 वरून 60 केल्याबाबतचा सोशल मीडियामध्ये फिरत असलेला शासन निर्णय बनावट असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.

शासन निर्णय क्र. अकंपा-1217/प्र.क्र.46/आठ, दि. 3 मे 2017 अन्वये अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी दरवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या दहा टक्के असलेली मर्यादा 1 मार्च 2017 पासून पुढे दोन वर्षे (28 फेब्रुवारी 2019) पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. या शासन निर्णयाचा संकेतांक क्रमांक हा 20175031552550207 असा आहे. हा शासन निर्णय अनुकंपा नियुक्तीशी संबंधित आहे.

या शासन निर्णयाचा क्रमांक तसेच संकेतांक क्रमांकाचा वापर करून "गट-क' संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याबाबतचा बनावट शासन निर्णय क्र. अकंपा-1217/प्र.क्र.46/आठ, 8 मे 2017 रोजी तयार करण्यात आला असून, तो सोशल मीडियावर (व्हॉट्‌सऍप इ.) फिरत आहे. हा शासन निर्णय हा बनावट असून, असा कोणताही शासन निर्णय देण्यात आलेला नाहीस, असे प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.