जुन्या नोटांतून पालिकांचे 1400 कोटी वसूल

Rupee
Rupee

मुंबई : राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांनी व्यवहारातून रद्द झालेल्या एक हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्याने विविध कर व थकबाकीपोटी विक्रमी 1400 कोटी 77 लाख रुपयांची कर वसुली झाली आहे. सर्वाधिक कर वसुली 489 कोटी 61 लाख रुपये बृहन्मुंबई महानगरपालिकेची, तर त्यानंतर पुणे महानगरपालिका 144 कोटी 52 लाख रुपये वसुली झाली आहे, अशी माहिती नगरविकास विभागाने दिली आहे. 
      

एक हजार व पाचशे रुपये मूल्यांच्या नोटा 8 नोव्हेंबर 2016 च्या मध्यरात्रीपासून व्यवहारातून रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांनी त्यांच्या विविध करांचा भरणा व थकबाकी भरण्यासाठी या जुन्या चलनातील नोटा स्वीकारल्याने गेल्या 15 दिवसांत राज्यातील नागरिकांनी त्यांचेकडील थकीत करांचा मोठया प्रमाणात भरणा केला आहे.
     

महानगरपालिकानिहाय जमा झालेली रक्कम रुपये 

महानगरपालिकेचे नाव    24 नोव्हेंबरपर्यंत जमा रक्कम


बृहन्मुंबई महानगरपालिका    489 कोटी 61 लाख

नवी मुंबई महानगरपालिका    57 कोटी 66 लाख

कल्याण-डोबिंवली महानगरपालिका    62 कोटी 67 लाख

मीरा-भाईंदर महानगरपालिका    70 कोटी 77 लाख

वसई- विरार महानगरपालिका    22 कोटी 96 लाख

उल्हासनगर महानगरपालिका    37 कोटी 18 लाख

पनवेल महानगरपालिका    7 कोटी 53 लाख

भिवंडी-निजामपूर महानगरपालिका    21 कोटी 55 लाख

पुणे महानगरपालिका    144 कोटी 52 लाख

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका    42 कोटी 14 लाख

ठाणे महानगरपालिका    51 कोटी 75  लाख

सांगली-कुपवाड महानगरपालिका    18 कोटी 30 लाख

कोल्हापूर महानगरपालिका    13 कोटी 94 लाख

अहमदनगर महानगरपालिका    9 कोटी 93 लाख

नाशिक महानगरपालिका    23 कोटी 50 लाख

धुळे महानगरपालिका    14 कोटी 95 लाख

जळगांव महानगरपालिका    13 कोटी 63 लाख

मालेगांव महानगरपालिका    8 कोटी 1 लाख

सोलापूर महानगरपालिका    27 कोटी 10 लाख

औरंगाबाद महानगरपालिका    16 कोटी 18 लाख

नांदेड-वाघाळा महानगरपालिका    17 कोटी 75 लाख

अकोला महानगरपालिका    5 कोटी 25 लाख

अमरावती महानगरपालिका    16 कोटी 20 लाख

नागपूर महानगरपालिका    32 कोटी 45 लाख

परभणी महानगरपालिका    94 लाख

लातूर महानगरपालिका    6 कोटी 77 लाख

चंद्रपूर महानगरपालिका    6 कोटी 81 लाख

राज्यातील सर्व नगरपालिका
(नगरपालिका प्रशासन संचालनालय)    160 कोटी 72 लाख

एकूण जमा रक्कम रुपये    1400 कोटी 77 लाख

याप्रमाणे व्यवहारातून रद्द झालेल्या जुन्या चलनाचा वापर करुन नागरिकांनी भरलेल्या करामुळे महानगरपालिका व नगरपालिकांची  विक्रमी 1 हजार 400 कोटी 77 लाख रुपयांची कर वसुली झाली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com