एमपीएससी परीक्षेत रोहितकुमार राजपूत प्रथम 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

मुंबई - राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (एमपीएससी) पुण्यातील रोहितकुमार राजपूत याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर, मुलींमधून रोहिणी नऱ्हे हिने प्रथम क्रमांक मिळवला. या दोघांचीही उप जिल्हाधिकारी पदासाठी निवड झाली आहे. 

राज्य सरकारने 2017 मध्ये उप जिल्हाधिकारी, सहाय्यक पोलिस आयुक्त, उप पोलिस अधीक्षक, विक्रीकर सहाय्यक आयुक्त या महत्त्वाच्या पदांसह विविध पदांसाठी परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. पुण्यातील विमान नगरमध्ये राहणारा राजपूत राज्यातून पहिला आला आहे. त्याला 599 गुण मिळाले. सुधीर पाटील दुसरा आला असून, 572 गुण मिळाले आहेत. सोपन टोंपे 571 गुण मिळवून राज्यात तिसरा आला. ओबीसी प्रवर्गातून दत्तू शेवाळे 566 गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातून प्रसन्नजीत प्रधान 531 गुण मिळवून पहिला आला आहे. 

गेल्या वर्षी झालेल्या परीक्षेतून 14 उमेदवारांची उपजिल्हाधिकारी, पाच उमेदवारांची पोलिस उप अधीक्षक - सहाय्यक आयुक्त आणि विक्रीकर विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी 41 उमेदवारांची निवड झाली आहे. 

Web Title: Rohit Kumar Rajpur First in MPSC Exam