'अग्निपथ योजने'त युवकांना कुठला जाॅब...,रोहित पवारांचा मोदी सरकारला सवाल

सैनिकी निष्ठा चार वर्षात निर्माण होतील का? ६ महिने प्रशिक्षण दिलेला युवक फिल्डवर पूर्ण क्षमतेने लढू शकेल का?
Rohit Pawar And Narendra Modi
Rohit Pawar And Narendra Modiesakal

अहमदनगर : भारतीय संरक्षण दलांमध्ये नोकर भर्तीसाठी मोदी सरकारने अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. बेरोजगार तरुणाला नोकरी या योजनेतून मिळेल, असा दावा सरकारने केला आहे. मात्र आज गुरुवारी (ता.१६) बिहार आणि हरियाणातील तरुणांनी अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अग्निपथ योजनेवर टीका केली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, कुठलीही चाचपणी न करता आणलेल्या नोटबंदी, जीएसटी यांचे परिणाम आजही देशाला भोगावे लागत आहेत. त्यामुळं किमान संरक्षणासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रात संरचनात्मक बदल करणारी एखादी योजना आणली जात असेल तर तत्पूर्वी ती प्रायोगिक तत्त्वावर राबवणं गरजेच आहे. (Rohit Pawar Criticize Modi Government Over Agnitpath Scheme)

Rohit Pawar And Narendra Modi
बेरोजगार तरुणांचा आवाज ऐका, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सल्ला

'अग्निपथ योजने'त (Agnipath Scheme) सहभागी होणाऱ्या युवकांना कुठलाही कायमस्वरुपी जाॅब नसल्याने आणि सैनिकांना निवृत्तीनंतर मिळणारे इतर लाभ नसल्याने सरकारचा खर्च वाचेल हे खरं आहे, पण खर्च कुठे वाचवायचा याचाही विचार होणं गरजेचं आहे, असा हल्लाबोल रोहित पवार यांनी नरेंद्र मोदी सरकारवर (Modi Government) केला. सैनिकी निष्ठा चार वर्षात निर्माण होतील का? ६ महिने प्रशिक्षण दिलेला युवक फिल्डवर पूर्ण क्षमतेने लढू शकेल का? पुरेसा अनुभव नसेल आणि अपूर्ण प्रशिक्षण यामुळं फिल्डवर लढताना या युवकांच्या जीवाला अधिक धोका, तर निर्माण होणार नाही ना? असे अनेक प्रश्न आहेत, असे ते म्हणाले.

Rohit Pawar And Narendra Modi
'माझीच बदनामी झाली, मला भरपाई द्या!' केतकी चितळे पुन्हा हायकोर्टात

चार वर्ष सेवेच्या काळात शिक्षणाच्या मूळ प्रवाहापासून लांब राहिलेल्या युवकांना चार वर्षानंतर काय संधी असतील याबद्दल कुठलीही स्पष्टता या योजनेत नाही. युवकांना रोजगार मिळेल असं केंद्र सांगत असलं तरी या योजनेतील रोजगार म्हणजे केवळ आजचं मरण उद्यावर ढकलण्यासारखं आहे, असा प्रश्न रोहित पवार यांनी अग्निपथ योजनेबाबत उपस्थित केला आहे. बेरोजगारीवरुन सरकारवर होणाऱ्या टीकेला वेगळं वळण देण्यासाठी आणि २०२४ च्या निवडणुकीच्या तयारीसाठी ही योजना आणली जात असेल तर मग हे राष्ट्रीय दुर्दैव आहे. केंद्राने या संदर्भात गांभीर्याने विचार करायला हवा, असे पवार म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com