rohit pawar
rohit pawaresakal

मालिकांचे 'NCB'वर आरोप; रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया

मात्र 'भाजपा'त खळबळ उडल्याचं जाणवत आहे. या गोष्टीचा शेवट व्हावा.
Summary

मात्र 'भाजपा'त खळबळ उडल्याचं जाणवत आहे. या गोष्टीचा शेवट व्हावा.

पुणे - राज्यात आर्यन खान केस प्रकरणी एनसीबीने केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. आता यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, आतापर्यंत मालिकांनी जी काही कागदपत्रं मिडियासमोर आणली आहेत, त्यानुसार हे सगळे आरोप सिद्ध असल्याशिवाय केले नसावेत. परंतु असे असले तरी पदाचा गैरवापर व्यक्तिगत हितासाठी करून अशा हेतूने ब्लॅकमेलिंग होत असेल तर ते चुकीचे आहे. त्यामुळे अशा प्रथा पाडू नयेत. आज रोहित पवार हे पुण्यामध्ये बोलत होते.

भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी सुनिल पाटील याचा राष्ट्रवादीच्या नेत्यांशी जवळचा संबंध असल्याचा दावा केला होता. त्याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, काही व्यक्तींना नावानिशी ओळखत नाही. कधी कुठे संबंध आला असेल, तर माहीत नाही. मात्र 'भाजपा'त खळबळ उडल्याचं जाणवत आहे. या गोष्टीचा शेवट व्हावा. जे लोक यात सहभागी आहेत, त्यांच्यावर कारवाई तात्काळ व्हावी अशी मागणीही रोहित पवार यांनी केली.

rohit pawar
'ही कुठल्या मंत्र्याची बेनामी संपत्ती ? ठाकरे सरकार जवाब दो' - सोमय्या

आतापर्यंत अनेकदा केंद्राकडून राज्याला पुरेशी मदत मिळत नसल्याचं आघाडी सरकारमधील नेत्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यावरून रोहित पवार यांनी राज्यातल्या विरोधी पक्षनेत्यांना टोला लगावला आहे. त्यांनी म्हटलं की, मला राज्यातल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना विचारायचं आहे की, राज्याच्या हितासाठी केंद्राकडे कसा पाठपुरावा केला आहे का तुम्ही ? केंद्रात कोणी ऐकत नाही असा विषय असू शकतो का? असं म्हणत केंद्रात तुमचं कोणी ऐकत नाही असंच अप्रत्यक्षपणे रोहित पवार यांनी म्हटलं.

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेल दरासंदर्भात ते म्हणाले, आधीच्या सरकारने गेल्या 6 वर्षात तिप्पट दर इंधनावर लावले आहेत. आतापर्यंत अतिरिक्त 8 लाख कोटी गोळा केले, तेव्हा राज्यातील भाजप कुठे होतं? लोकसभेच्या पोटनिवडणुका होतात तेव्हा दर कमी होतात. आताही यूपीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे दर कमी होताहेत का? असा सवालही आमदार रोहित पवार यांनी केला आहे. राज्यातील भाजप नेत्यांना फक्त राजकारण करणं माहीत आहे. आपत्तीवेळी आपल्या राज्याला केंद्राकडून किती मदत मिळतेय हे राज्यातील भाजपच्या लोकांनीही एकदा वेळ काढून पहावं, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

rohit pawar
वानखेडेंच्या वडिलांकडून 1.25 कोटींची मागणी; मलिकांविरोधात मानहानीचा दावा

अहमदनगरमध्ये जिल्हा रुग्णालयात आग लागून ११ जणांचा मृत्यू झाला. याबाबत प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले की, या घटनेबाबत कुणीही राजकारण करु नये. नगर दुर्घटनेत जी समिती स्थापन केलीय, त्यांनी लवकरात लवकर कोण दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com