महागड्यावर गाड्या आरटीओच्या रडारवर 

महागड्यावर गाड्या आरटीओच्या रडारवर 

मुंबई - करचुकवेगिरी करणाऱ्या महागड्या गाड्यांचे मालक प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) रडारवर आहेत. केंद्रशासित प्रदेश किंवा इतर राज्यात नोंदणी करून आणल्या जाणाऱ्या अशा गाड्यांवर "आरटीओ'ने राज्यभर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. पण वडाळा आणि ताडदेव आरटीओ कार्यालयात "वाहन-4' या ऑनलाइन प्रणालीतील गोंधळामुळे संबंधित गाडीमालकांना दंडच भरता येत नसल्याचे उघड झाले आहे. 

परिवहन खात्याच्या निर्देशानुसार 18 जानेवारीपासून कर चुकविणाऱ्या महागड्या गाड्यांच्या मालकांवर राज्यभर कारवाई केली जात आहे. कमी नोंदणी शुल्क असलेल्या राज्यांत गाडी खरेदी करून ती महाराष्ट्रात आणण्याची शक्कल लढवली जाते. त्यामुळे राज्याला महसुलावर पाणी सोडावे लागते. या पद्धतीच्या इतर राज्यांतील गाड्यांवर एकूण किमतीच्या 10 टक्के, तर आयात केलेल्या गाडीवर जास्तीत जास्त 20 टक्के कर आहे. ताडदेव आरटीओने या मोहिमेत 29 गाड्या जप्त केल्या. गाडीचे मालक दंड भरण्यासाठी तयार असले, तरी "वाहन-4' या ऑनलाइन प्रणालीतील गोंधळामुळे ते भरू शकत नाहीत. महिनाभरापासून प्रणालीतील तक्रारींचा पाढा परिवहन विभागाने दिल्लीतील नॅशनल इन्फॉर्मेशन सिस्टीमकडे (एनआयसी) वाचला आहे; त्याची दखल अद्याप घेण्यात आलेली नाही. 

टॅक्‍सीला अधिक फटका 

टॅक्‍सींच्या नूतनीकरण व नोंदणीला सर्वाधिक फटका बसला आहे. 100 हून अधिक टॅक्‍सींच्या नूतनीकरणाची प्रकरणे नव्या प्रणालीमुळे अडकली आहेत. तर नवी टॅक्‍सी घेऊनही नोंदणीची 20 प्रकरणे रखडल्याची माहिती परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com