अत्याचाराचे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवा - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

उस्मानाबाद - राज्यात गुन्हेगारांना पोलिस प्रशासनाचा वचक राहिलेला नाही. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे प्रकार वाढत आहेत. तपासाच्या दिरंगाईने शिक्षा होण्याचे प्रमाण घटत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींमध्ये अस्वस्थता वाढत आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे व्यक्त केले. उस्मानाबाद शहरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, अशी सूचनाही त्यांनी केली.  

श्री. पवार यांनी रविवारी (ता. सात) शहरातील शिंगोली विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. शहरात एका अल्पवयीन मुलीवर पोलिस उपनिरीक्षकाकडून अत्याचार झाल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून मिळाली. त्यानंतर तातडीने उस्मानाबादला येण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणाचा तपास गतीने व्हावा. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे. उत्तम शासकीय वकील द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पोलिसांनी हे प्रकरण तत्परतेने हाताळल्याने, तपास वरिष्ठ अधिकाऱ्याकडे दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. राज्यात मुलींवरील अत्याचाराचे प्रकार सातत्याने होत आहेत. गुन्हेगारांना पोलिस यंत्रणेचा दरारा राहिला नाही. कायदे चांगले असले तरी योग्य पाठपुरावा केला जात नाही. परिणामी शिक्षेचे प्रमाण कमी असल्याचे दिसते. अशा प्रकरणाची गंभीर दखल घेतली जावी, पोलिस प्रशासनावर दबाव राहावा, यासाठी ही भेट होती, असेही पवार म्हणाले.

आता गोरक्षक सुधारतील

गोरक्षक हे गो-भक्षक आहेत, ही बाब लवकर कळाल्याचे सांगत श्री. पवार यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. आता यापुढे असे गोरक्षक सुधारतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्यात आमदारांच्या पगारवाढीलाही त्यांनी अप्रत्यक्ष सहमती दर्शविली. विधिमंडळात एकमताने घेतलेल्या निर्णयाला विरोध करता येणार नाही, असे ते म्हणाले.