युतीचा संसार तुटल्याने अतीव दुःख- शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जानेवारी 2017

मुंबई/पुणे- "उद्धव ठाकरेंनी युती होणार नसल्याचं स्पष्ट करायला खूप उशीर केला. त्यांचा 25 वर्षांचा संसार तुटल्याने अतीव दु:ख झालं," असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती होणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर पवार यांनी मंगळवारी बोलताना वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजप किंवा शिवसेना असा कोणी चर्चेला आला तर असा प्रश्न पवारांना विचारण्यात आलाय. हा 'जर-तर'चा प्रश्न आहे 'जर-तर'ला उत्तर नाही; पण चर्चेला आले तर नक्की विचार करू असं म्हणत शरद पवार यांनी राज्य सरकारला पाठिंबा देण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

सेना-भाजपने झुलवत ठेवलं
काँग्रेसचे नेते नारायण राणे म्हणाले, "सेना आणि भाजप या दोघांनाही एकत्र लढायचं नव्हतं दोघांनाही स्वबळावर लढायचं होतं. दोन्ही पक्षांनी फक्त कार्यकर्त्यांना झुलवत ठेवण्याचं काम केलं. 
सेना आणि भाजपने गेल्या २५ वर्षांत कोणत्याही प्रकारचा विकास केलेला नाही पालिकेत फक्त भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप नारायण राणे यांनी केलाय. तसंच आता युती तुटतेय लोकांना बर वाटतय त्यामुळे लोक काँग्रेसला मत देतील असा विश्वास देखील राणे यांनी व्यक्त केलाय. तर  सेना भावनिक आवाहन करून  निवडणूक लढवत होती," असेदेखील राणे यांनी म्हटलं.
 
Web Title: sad to see breakup of bjp sena, says sharad pawar