मला भेटणारे शेतकरी आजही मलाच कृषीमंत्री समजतात-सदाभाऊ खोत

भेटतात का साहेब तुम्हाला असे शेतकरी? सदाभाऊ खोत
sadabhau khot
sadabhau khotesakal

गेल्या काही दिवसांपासून अनेक घटनांमुळे, प्रकरणांमुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्यावर आरोप- प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दरम्यान, जळलेला ऊस हातात घेऊन मरण्याचाच पर्याय राहिलाय असं सुचवणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओवरून त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. मला भेटणारे शेतकरी आजही मलाच कृषीमंत्री समजतात अशा शब्दात घणाघात केला आहे.

sadabhau khot
दिशाभूल करण्यासाठी कला क्षेत्राचा वापर; अमोल कोल्हेंची टीका

सदाभाऊ ट्विट करत म्हणाले, महावितरणाच्या गलिच्छ कारभाराने ऊस पार जळाल्यानं आता काय करावं म्हणत जळलेला ऊस हातात घेऊन मरण्याचाच पर्याय राहिलाय असं सुचवणाऱ्या त्याबाई सारख्या शेतकऱ्यांचा आक्रोश कधी तुमच्या बंद कानावर पडतो का साहेब? भेटतात का साहेब तुम्हाला असे शेतकरी? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

Summary

मरण्याचाच पर्याय राहिलाय असं सुचवणाऱ्या त्याबाई सारख्या शेतकऱ्यांचा आक्रोश कधी तुमच्या बंद कानावर पडतो का साहेब?

sadabhau khot
क्रियापदाला ED लागलं की त्याचा काळ बदलतो- चित्रा वाघ

ते म्हणतात, फार वाईट वाटतं अशा घटना उघड्या डोळ्यांनी पहाव्या लागत आहेत. सात जन्माचे वैरी बसले आहेत सत्तेत. ह्या आक्रोशाची धग शेतकरी माऊलीचा शाप आहे. ही महाविकास आघाडी नव्हे तर महाभस्मासुर आघाडी आहे. मविआच्या पापी मंत्र्यांनो तुमच्या अशा वागण्याने नरकातही तुमच्यासोबत तुच्छ व्यवहार होईल अशी टीका केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com