माध्यम शिक्षणासाठी सकाळ-झेवियर्स एकत्र

माध्यम शिक्षणासाठी सकाळ-झेवियर्स एकत्र

पुणे - माध्यमक्षेत्रात विश्वसनीय आणि अग्रेसर असणारा ‘सकाळ माध्यम समूह’ आणि देशातील पत्रकारितेचे शिक्षण देणारी देशातील सर्वोत्कृष्ट संस्था ‘झेवियर्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्स’ विद्यार्थ्यांसाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन जर्नालिझम अँड मास मीडिया हा अभ्यासक्रम सुरू करत आहेत. 

अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. बदलत्या जगातील या सर्व माध्यमांचा अभ्यास एकत्रितपणे करण्याची संधी या अभ्यासक्रमाच्या निमित्ताने उपलब्ध होत आहे. अशी संधी देणारा मराठी माध्यमातला सध्या हा एकमेव अभ्यासक्रम आहे.

अभ्यासक्रमात पत्रकारितेच्या सैद्धांतिक शिक्षणाबरोबर कार्यानुभवावरही भर देण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘सकाळ माध्यम समूहा’ची ‘सकाळ’, ‘गोमंतक’, ‘ॲग्रोवन’, ‘सकाळ साप्ताहिक’, ‘तनिष्का’, ‘प्रीमियर’ अशी प्रकाशने, तसेच ‘साम’ वाहिनी आणि ‘ई-सकाळ’सारख्या डिजिटल माध्यमात ‘ऑन जॉब ट्रेनिंग’चा समावेश हे अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य आहे. शिकत असतानाच ‘सकाळ’ समूहात काम करणाऱ्या प्रथितयश पत्रकार, संपादकांबरोबर काम करण्याची संधी मिळणार आहे. राज्यातील विविध माध्यम समूहांसोबत इंटर्नशिपची संधी, असे अभ्यासक्रमाचे स्वरूप आहे. विद्यार्थ्यांना नोकरीसाठी १०० टक्के साह्य देण्याचा प्रयत्न असेल.

मुलाखतीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना www.apglearning.in किंवा www.xaviercomm.org संकेतस्थळावर एक अर्ज भरावा लागेल.
अभ्यासक्रमासाठी प्रतिविद्यार्थी शुल्क-  रु. ९७,४५८ अधिक जीएसटी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जाची सुविधा उपलब्ध.
संपर्क- ७३५०००१६०२ / contact@apglearning.in

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com